आजचा वाढदिवस : चंद्रदीप नरके - आमदार, करवीर (कोल्हापूर)  - chandradeep narke mla karveer birthday | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस : चंद्रदीप नरके - आमदार, करवीर (कोल्हापूर) 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

चंद्रदीप नरके हे करवीर, गगनबावडा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार आहेत. शिवसेनेचे आक्रमक आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. 2009 व 2014 च्या विधानसभा
निवडणुकीत त्यांनी दणदणीत विजय मिळवला. 2019 च्या निवडणुकीत हॅटट्रिक करण्याची जय्यत तयारी त्यांनी सुरू केली आहे. कुंभी सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून नरके कुटुंबीयांनी मतदारसंघावर आपली पकड मजबूत केली आहे. कोल्हापूरचा टोल हद्दपार करण्यासाठी मोठे आंदोलन उभारण्यात आले होते. या आंदोलनात आमदार नरके आघाडीवर होते. याचबरोबर गोकूळ मल्टीस्टेट विरोधातील आंदोलनातही ते आघाडीवर होते. रंकाळा स्वच्छता मोहिमेत त्यांचा सहभाग नेहमी असतो. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख