वंचीत बहुजन आघाडी, आम आदमी पक्षापुढे २ टक्के मतांची प्रतिमा पुसण्याचे आव्हान

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजु लागले आहेत. त्यासाठी गुप्तचर विभाग रोज राजकीय पक्ष, उमेदवारांची क्षमता, प्रभाव याविषयी अहवाल पाठवतो आहे. त्यांच्या ताज्या अंदाजानुसार लहान पक्ष केवळ दोन टक्के मतांचे धनी आहेत. त्यामुळे सध्या त्यांचा प्रस्थापित पक्ष, उमेदवाराच्या निकालावर फारसा परिणाम होण्याची चिन्हे नाहीत.
वंचीत बहुजन आघाडी, आम आदमी पक्षापुढे २ टक्के मतांची प्रतिमा पुसण्याचे आव्हान

नाशिक : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजु लागले आहेत. त्यासाठी गुप्तचर विभाग रोज राजकीय पक्ष, उमेदवारांची क्षमता, प्रभाव याविषयी अहवाल पाठवतो आहे. त्यांच्या ताज्या अंदाजानुसार लहान पक्ष केवळ दोन टक्के मतांचे धनी आहेत. त्यामुळे सध्या त्यांचा प्रस्थापित पक्ष, उमेदवाराच्या निकालावर फारसा परिणाम होण्याची चिन्हे नाहीत.

लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस आघाडी, शिवसेना, भाजप युती या प्रस्थापित पक्षांसह काही लहान पक्ष देखील उमेदवारीच्या घोषणा करु लागले आहेत. त्याचा प्रचार, निकालावर काय परिणाम होईल याबाबत भिन्न दावे केले जात आहेत. उमेदवारी करणारा प्रत्येक उमेदवार त्याच्या विजयाचे गणित कसे पक्के आहे, तोच कसा विजयी होणार हे सांगतो. यासंदर्भात पोलिसांचा गुप्तचर विभाग नियमितपणे गृह विभागाला निवडणुकीचे अंदाज व राजकीय स्थितीचा अहवाल पाटवत असतो. त्यात गेल्या सर्व निवडणुकांचा कल काय राहिला? कोणत्या पक्षाचा किती प्रभाव होता?. उमेदवाराच्या मुल्यापणानुसार आजवर पाठविलेल्या अहवालाचांही अभ्यास केला जातो. त्यातून कोणाला किती अपेक्षीत मतदान होईल याचा अंदाज व्यक्त केला जातो.

नुकताच असा एक अहवाल पाठविल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यानुसार निवडणुकीत जास्तीत जास्त ६२ ते ६५ टक्के मतदान होते. त्यात युती व आघाडीचे उमेदवार ऐंशी टक्‍क्‍यांहून अधिक मते मिळवतील. उर्वरीत वीस टक्के मतांत नोटा, अपक्ष व लहान पक्षांचे उमेदवार वाटेकरी होतील. यंदा वंचित बहुजन आघाडी व एमआयएम, आम आदमी पार्टी, भारतीय ट्रायबल पार्टी, बहुजन समाज पार्टी, संघर्ष सेना (स्थानिक) हे पक्ष उमेदवार देण्याची शक्‍यता आहे. यातील फार थोडे प्रस्थापित पक्ष, उमेदवारांपुढे शेवटपर्यंत तग धरतात. मोठे पक्ष गाजावाजा, प्रचार, बडेजाव, संघटन शक्ती, राष्ट्रीय नेतृत्व, मुद्दे यानुसार माध्यमे व मतदारांत मोठी जागा व्यापतात. त्याचा परिणाम मतदानावर होतो. त्यामुळे अन्य उमेदवारांना केवळ दोन टक्के मते मिळतात, असा अंदाज अहवालात असल्याचे सांगण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com