जळगावात भाजप आमदार भोळें समोर उमेदवार देण्याचे विरोधकांपुढे आव्हान

जळगाव शहरात भारतीय जनता पक्षात नगरसेवकपदापासून आपली राजकीय आमदार सुरेश भोळे यांनी सुरू केली. महापालित त्यांनी विरोधी पक्षनेतेपद भूषवून आपल्या कामगिरी छाप उमटविली. त्यानंतर सन 2014च्या निवडणूकीत पक्षाने त्यांना जळगाव मतदार संघातून उमेदवारी दिली. तब्बल आठ वेळा जळगावचे आमदार असलेले सुरेशदादा जैन यांचा मोठ्या मताधिक्‍याने त्यांनी पराभव केला. राज्यात ते 'जायंट किलर'ठरले
BJP Mla Suresh Bhole Jalgaon
BJP Mla Suresh Bhole Jalgaon

जळगाव : गेल्या अनेक वर्षापासून कर्जाच्या ओझ्याखाली असलेली महापालिका कर्जमुक्त करण्यासह शहरातील शिवाजी नगर पूल, पिंप्राळा पुलाच्या नूतनीकरण करण्यासाठी निधी मंजूर करून कामही सुरू करण्याचा दावा जळगावचे आमदार सुरेश भोळे यांनी केला आहे. या शिवाय त्यांचा शहरात दांडगा लोकसंपर्क असून कार्यकर्त्यांचे जाळे असल्यामुळे जळगाव शहर मतदार संघात विरोधकांसमोर आमदार भोळे यांचेच मोठे आव्हान आहे. त्यांच्या समोर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे उमेदवार कोण? याकडेच आता लक्ष आहे.

जळगाव शहरात भारतीय जनता पक्षात नगरसेवकपदापासून आपली राजकीय आमदार सुरेश भोळे यांनी सुरू केली. महापालित त्यांनी विरोधी पक्षनेतेपद भूषवून आपल्या कामगिरी छाप उमटविली. त्यानंतर सन 2014च्या निवडणूकीत पक्षाने त्यांना जळगाव मतदार संघातून उमेदवारी दिली. तब्बल आठ वेळा जळगावचे आमदार असलेले सुरेशदादा जैन यांचा मोठ्या मताधिक्‍याने त्यांनी पराभव केला. राज्यात ते 'जायंट किलर'ठरले. आमदार झाल्यानंतर जळगाव महापालिका हुडको व जिल्हा बॅंकेच्या कर्जाच्या ओझ्यातून मुक्त करण्याचे त्यांच्यासमोर सर्वात मोठे आव्हान होते. जिल्हयाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळोवेळी भेट घेवून केंद्रांच्या माध्यमातून हा प्रश्‍न सोडवून घेतला.

गेल्या अनेक वर्षापासून कर्जात असलेली महापालिका आज कर्जमुक्त करण्याचे काम केल्याचा दावा आमदार भोळे यांनी केला आहे. शहरात शिवाजी नगर रेल्वे पूल जीर्ण झाला होता. मात्र त्याच्या नूतणीकरणाबाबत प्रश्‍न गेल्या अनेक वर्षापासून रेंगाळला होता. त्याच्यासाठी शासनाकडून निधी मंजूर करून त्याचे कामही आता सुरू झाले आहे. तर पिप्रांळा रेल्वे गेटच्या जागेवर उड्डाणपूलासाठी निधी मंजूर करण्यात आला असून त्याचे कामही लवकरच सुरू करण्यात येणार आहे. महामार्गावर समातंर रस्त्याचे कामही सुरू करण्यात आले असून शहराच्या विकासासाठी आठशे कोटी रूपयांचा निधी उपलब्ध केल्याचा दावाही आमदार भोळे यांनी केला आहे. 

महापालिकेच्या माध्यमातून शहरात अमृत योजनेचे काम सुरू आहे, भुयारी गटारींना मंजूरी देण्यात आली असून त्यासाठी शासनाचा निधी मंजूर असून त्याचे कामही लवकरच सुरू होणार असल्याचे भोळे यांनी सांगितले.शहरात सद्या रस्त्यावरील खड्डयांची मोठी समस्या आहे.त्यामुळे जनतेत मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. अमृत योजनेच्या दिरंगाईच्या कामामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. मात्र, ठेकेदारास वेगाने काम करण्याचे आदेश दिले असल्याचेही आमदार भोळे यांनी स्पष्ट केले आहे. 

कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीत जळगाव मतदार संघ कॉंग्रेसकडे आहे, कॉंग्रेसतर्फे डॉ.राध्येश्‍याम चौधरी यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत आहेत. 'जळगाव फर्स्ट'च्या माध्यमातून त्यांनी जळगाव शहरातील विविध समस्यावर आंदोलन केले आहे. तसेच कॉंग्रेस पक्षाचे ते महानगराध्य आहेत. त्या माध्यमातून ही त्यांनी मोर्चे काढून शहरातील समस्यावर आवाज उठविला आहे. त्यामुळे कॉंग्रेसतर्फे ते दमदार उमेदवार मानले जात आहेत. मात्र, पक्षातर्फे ऐनवेळी उमेदवार बदलणार काय? याबाबतही चर्चा सुरू आहे. 

युती झाली नाही तर शिवसेनेची या मतदार संघात लढण्याची तयारी आहे. सुरेशदादा जैन याच मतदार संघात शिवसेनेतर्फे विजयी झाले होते. त्यामुळे या मतदार संघात शिवसेनेची पकडही चांगली आहे. परंतु, घरकुल गैरव्यवहाराच्या निकलात सुरेशदादा जैन यांना शिक्षा झाल्यामुळे शिवसेनेचा दावा कमकुवत असला तरी माजी महापौर विष्णू भंगाळे व माजी उपमहापौर सुनिल महाजन यांची लढण्याची तयारी आहे. त्यांनी मुंबईत पक्षनेतृत्वाकडे मुलाखतही दिली आहे. मात्र, युतीबाबत अद्यापही संभ्रम आहे. त्यामुळे शिवसेना लढण्याचेही निश्‍चित नाही, अशा स्थितीत आमदार भोळे याच्या विरोधात उमेदवार कोण? हेच विरोधकासमोर मोठे आव्हान आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com