नांदेडचा गड राखून ठेवण्याचे अशोक चव्हाणांसमोर आव्हान

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघात सध्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे नांदेडमधून निवडणुकीच्या रिंगणात असून कोणत्याही परिस्थितीत पुन्हा एकदा भाजपला पराभूत करुन नांदेडचा गड राखून ठेवण्याचे त्यांच्यासमोर आव्हान आहे. सध्या श्री. चव्हाण यांनी नांदेड शहरासह ग्रामिण भागात विविध ठिकाणी सभा घेण्यावर भर दिला आहे.
नांदेडचा गड राखून ठेवण्याचे अशोक चव्हाणांसमोर आव्हान

नांदेड : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघात सध्या निवडणुकीच्या निमित्ताने प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे नांदेडमधून निवडणुकीच्या रिंगणात असून कोणत्याही परिस्थितीत पुन्हा एकदा भाजपला पराभूत करुन नांदेडचा गड राखून ठेवण्याचे त्यांच्यासमोर आव्हान आहे. सध्या श्री. चव्हाण यांनी नांदेड शहरासह ग्रामिण भागात विविध ठिकाणी सभा घेण्यावर भर दिला आहे.

एकीकडे उमेदवार म्हणून नांदेडमध्ये प्रचार करायचा आणि दुसरीकडे राज्यात प्रदेशाध्यक्ष या नात्याने कॉंग्रेसच्या सभांना उपस्थित राहण्याची दुहेरी कसरत श्री. चव्हाण यांना करावी लागत आहे. नांदेडमध्ये गुंतवून ठेवण्यासाठी भाजपची खेळी यशस्वी झाली असली तरी त्यावर मात करत श्री. चव्हाण यांनी राज्यातही दौरे सुरुच ठेवले आहेत. नांदेडमध्ये कॉंग्रेसच्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या समन्वय ठेवत तसेच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेत सध्या अशोक चव्हाण प्रचार सभा घेत असून बारा ते चौदा तास ते देत आहेत.

प्रचार सभांच्या माध्यमातून भाजप सरकार आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर चौफेर टीका करत कॉंग्रेसची भूमिका आणि विकासकामांच्या मुद्यांवर ते भर देत आहेत. गेल्या पाच वर्षात किती घोषणा भाजप सरकार आणि मोदी, फडणवीस यांनी केल्या आणि त्यातील कितीची पूर्तता झाली, याचा लेखा जोखा मतदारांसमोर मांडत आहेत. गेल्या वेळेस २०१४ मध्ये मोदी लाटेतही श्री. चव्हाण यांनी विजयश्री खेचून आणली होती आता २०१९ मध्ये पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या श्री. चव्हाण यांनी विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यांच्या विरोधात यावेळी भाजपने त्यांचेच कट्टर विरोधक प्रताप पाटील चिखलीकर यांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे प्रचारात रंगत भरली असून त्यात त्यांना कितपत यश मिळेल हे येत्या २२ मे रोजी मतमोजणीच्या दिवशी निकालानंतर स्पष्ट होईल.

अशोक चव्हाण यांच्या प्रचारातील मुद्दे  
- राज्यात १५ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतीमालाला भाव नाही, बोंडअळीचे पैसे मिळाले नाहीत. दूध, भाजीपाला रस्त्यावर फेकला, आंदोलने झाली, मोर्चे निघाले. तरीदेखील भाजप सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी शेवटपर्यंत केली नाही.
- उमरी तालुक्यातील तुराटी येथे शेतकऱ्याने स्वतः चिता रचून आत्महत्या केली, तरीदेखील गप्प राहिलेल्या भाजप सरकारला लाज कशी वाटत नाही?’’
- सर्वसामान्यांच्या हिताच्या योजना बंद केल्या. उज्ज्वला गॅस योजना फसवी निघाली. हाताला काम नसल्याने बेरोजगारी वाढली. सुशिक्षितांना पकोडे विकण्यास भाजप सरकारने सांगून त्यांची अवहेलना केली.
- भाजप सरकारमुळे शेतकरी, मागासवर्गीय, अल्पसंख्याक, व्यापारी, विद्यार्थ्यांची अवस्था बिकट झाल्याचे सांगून भाजपच्या सरकारच्या काळात देशाची लोकशाही धोक्यात आली  आहे.
- डाॅ. शंकरराव चव्हाण यांची दूरदृष्टी आणि नियोजनामुळे नांदेडकरांवर पाणी विकत घेण्याची वेळ आली नाही. मराठवाड्यात लातूर, परभणी, जालना आदी जिल्ह्यांत पाणी मिळत नाही. परंतु, नांदेडमध्ये पाणी मुबलक आहे.
- देशाच्या चाव्या कोणाकडे द्यायच्या, यासाठी ही लोकसभेची निवडणूक असून मतदारांनीदेखील देशाचे हित पाहणाऱ्या पक्ष आणि उमेदवारांकडे लक्ष द्यावे. कॉंग्रेस पक्षाने नेहमीच देशाचे हितच पाहिले आहे.
- गेल्या पाच वर्षांत केंद्र आणि राज्यातील भाजप सेना सरकारने नांदेड जिल्ह्यासाठी कुठलाही निधी दिला नाही. दुष्काळामध्येदेखील त्यांनी भेदभाव केला. मी मुख्यमंत्री असताना नांदेड जिल्हा सरसकट टंचाईग्रस्त म्हणून घोषित केला होता.
- बाजार समित्यांमध्ये पहिल्यासारखी आवक राहिली नाही. जीएसटीमुळे व्यापारी वर्ग त्रस्त झाला आहे. सद्यःपरिस्थितीत ५० टक्के व्यापार कमी झाला असून व्यापारीदेखील हवालदिल झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com