गांभीर्य ठेवा; लॉकडाऊन व्यवस्थित झाल्याने 'वुहान' पुन्हा सुरू झाले!

लॉक डाऊन व्यवस्थित झाला तर आपणही निश्‍चितपणे यातून बाहेर पडू. कोरोनाचा संसर्ग होऊनये, यासाठी सर्वांनी लॉकडाऊनमध्ये सहभागी होऊन घरातच बसावे.
ramraje advice follow lock down seriously
ramraje advice follow lock down seriously

सातारा : लॉकडाऊन, हात धुणे आणि संसर्ग टाळण्याच्या उपाय योजनाबाबत गांभीर्याने घेऊन प्रत्येक नागरीकाने प्रशासनाच्या सूचनांचे पालन केले तर आपण कोरोनावर मात करू शकतो. त्यासाठी सर्वांनी प्रशासनास सहकार्य करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी 'सरकारनामा'शी बोलताना व्यक्त केली.

राज्यात सध्या कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन केले आहे. तरीही काही नागरीक विनाकारण घराबाहेर पडत आहेत. यामुळे संसर्गाचा धोका आहे. यावर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी जनतेला संदेश दिला आहे. ते म्हणाले, शासनाने जे आदेश दिले आहेत, ते प्रामाणिकपणे पाळावे. चीनचे वुहान शहर पुन्हा सुरू होत आहे. त्यामुळे लॉक डाऊन व्यवस्थित झाला तर आपणही निश्‍चितपणे यातून बाहेर पडू. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी सर्वांनी लॉकडाऊनमध्ये सहभागी होऊन घरातच बसावे. तसेच हात धुणे, विनाकारण बाहेर फिरू नये. सामाजिक अंतर ठेवणे हे उपाय करून आपण कोरोनाचा संसर्ग रोखू शकतो. तसेच कोरोना सारख्या महामारीवर यशस्वीपणे मात करू शकतो. त्यामुळे महाराष्ट्रातील
जनतेने प्रशासनास सहकार्य करावे, असे निंबाळकर यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com