नाराज चैनसुख संचेती यांनी वर्षभरानंतर घेतला पदभार

...
sancheti chainsukh
sancheti chainsukh

नागपूर : सामाजिक असमतोल दूर करण्याबाबत स्थापन करण्यात आलेल्या केळकर समितीचा अहवाल सरकारने स्वीकारलाच नसल्याचा खुलासा विदर्भ विकास महामंळडाचे अध्यक्ष चैनसुख संचेती यांनी केला. 

विदर्भ विकास महामंडळाच्या विश्‍वस्त मंडळाची बैठक गुरुवारी पार पडली. राज्यातील असमतोल दूर करण्यासाठी विकास मंडळाची स्थापना करण्यात आली. विदर्भाच्या विकासासाठी अनेक अभ्यासपूर्ण अहवाल तयार करण्यात येत आहेत. वन्यजीव व प्राण्यांपासून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. ते कमी करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात येत असल्याचे संचेती पत्रकारांना सांगितले. 

पश्‍चिम विदर्भातील अकोला, वाशीम, बुलडाणा व अमरावती जिल्ह्यांत एक लाख 79 हजार 477 हेक्‍टरचा भौतिक अनुशेष शिल्लक आहे. हा अनुशेष 1994च्या निकषांनुसार आहे. यासाठी लागणाऱ्या निधीची माहिती त्यांनी दिली नाही. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने चार वर्षांत माहितीच दिली नसल्याचे कारण सांगत आकडे देण्यास हतबलता दर्शविली.

 हा अनुशेष दूर करण्यासाठी यावर्षी 765 कोटींची  तरतूद केल्याचे ते म्हणाले. पूर्व विदर्भातील सहा जिल्हे आणि यवतमाळ जिल्ह्यात कुठल्याही प्रकारचा अनुशेष शिल्लक नाही. विदर्भात 56 सिंचन प्रकल्प केंद्र सरकारने आपल्याकडे घेतल्याचे संचेतींनी सांगितले. 2022 पर्यंत सर्व अनुशेष दूर करू, असा दावा त्यांनी केला. यावेळी कपिल चंद्रायण, डॉ. रवींद्र कोल्हे, किशोर मोघे आदी उपस्थित होते. 

विदर्भ विकासासाठी प्रत्येक जिल्ह्याचे व्हीजन डॉक्‍युमेंट तयार करण्यात येत आहे. गडचिरोली व यवतमाळ जिल्ह्याचे डॉक्‍युमेंट तयार झाले असून, राज्यपालांना सादर करण्यात आले. गोंदिया आणि वाशीम जिल्ह्यांच्या डॉक्‍युमेंटचे काम अंतिम टप्प्यात आहे. रोजगार निर्मिती कशी होईल, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासोबत नागरिकांचे डरडोई उत्पन्न वाढविण्याबाबचा अभ्यास करण्यात येत आहे.

 विदर्भाच्या विकासासंदर्भात उपसमिती तयार केली असून, वर्षाअखेर अहवाल देणार असल्याचे चैनसुख संचेती यांनी सांगितले. नाराज असल्यानेच वर्षभरानंतर महामंडळाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्याची चर्चा असल्याच्या प्रश्‍नावर संचेती म्हणाले, काम करण्यासाठी वेळेची गरज नसते. सर्वांत ज्येष्ठ सदस्य असल्यानेच हे पद मिळाले आहे. कोणत्याही प्रकारची नाराजी नसल्याचे त्यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com