आजचा वाढदिवस : चैनसुख संचेती, आमदार, मलकापूर, बुलडाणा.  - chainsukh sancheti mla | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई , 7 किलोग्राम यूरेनियमसह 2 जणांना अटक. दोन्ही आरोपी मागिल अनेक दिवसांपासून ग्राहकांच्या शोधात होते. जप्त केलेल्या युरेनियमची किंमत बाजारात २१ कोटी रुपये आहे.
गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील घरासमोर अज्ञाताने शेणी पेटवल्या, त्यामुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या पेटवलेल्या शेणी विझवून तेथून हटविल्या आहेत .

आजचा वाढदिवस : चैनसुख संचेती, आमदार, मलकापूर, बुलडाणा. 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 16 डिसेंबर 2017

 

 

सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील दिग्गज नेते म्हणून राज्याच्या राजकारणात आमदार चैनसुख संचेती यांना ओळखले जाते. सलग 22 वर्ष मलकापूर विधानसभा मतदारसंघावर राजकीय वर्चस्व गाजविणारे आमदार चैनसुख संचेती यांनी विधानसभेची पहिली निवडणूक 1995 साली अपक्ष लढवून विधानसभेत दमदार एन्ट्री केली. सुरवातीपासूनच जनसंघाशी जवळचा संबंध असल्याने परत भाजपत प्रवेश करून सत्ता नसतानाही पक्षाशी एकनिष्ठता ठेवली. विकासकामांना वेळोवेळी प्राधान्य दिले गेल्याने जनतेसोबत त्यांची नाळ जुळली गेली आहे. अनेक सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सहकार क्षेत्रातील पदे भूषवून त्यांनी मतदारसंघातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. आजही तेच जनसेवेचे व्रत ते जोपासत आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख