Chagan Bhujbals Disciple Kushwaha Elected in MP | Sarkarnama

छगन भुजबळांचे शिष्य सिद्धार्थ कुशवाह झाले मध्य प्रदेशचे आमदार 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 12 डिसेंबर 2018

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे शिष्य असलेले सिद्धार्थ कुशवाह मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. कुशवाह सतना मतदारसंघातुन कॉंग्रेसचे उमेदवार म्हणुन निवडून आले. कुशवाह अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे मध्य प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष आहेत.

नाशिक : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे शिष्य असलेले सिद्धार्थ कुशवाह मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आहेत. कुशवाह सतना मतदारसंघातुन कॉंग्रेसचे उमेदवार म्हणुन निवडून आले. कुशवाह अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे मध्य प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष आहेत. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क करून त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे. 

सिद्धार्थ कुशवाह हे सतना विधानसभा मतदार संघातून काँग्रेस पक्षाकडून पंधरा हजार मतांच्या मताधिक्‍याने विजयी झाले आहेत. सिद्धार्थ कुशवाह यांच्यावर मध्यप्रदेश समता परिषदेची महत्वाची जबाबदारी आहे. मध्य प्रदेशातील सतना भागात त्यांचे वर्चस्व असून त्यांचे वडील हे सतना लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आहेत. छगन भुजबळ यांच्या प्रत्येक आंदोलन व समता परिषदेच्या कार्यक्रमांत त्यांचा सक्रीय सहभाग असतो. त्यांच्या निवडीनंतर नाशिकमध्ये भुजबळ समर्थकांनी जल्लोष केला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख