छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांसमवेत बघितला तान्हाजी चित्रपट; म्हणाले, लवकरच करमुक्त करणार

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री ना.छगन भुजबळ यांनी आपल्या व्यस्त शेड्युल मधून कालकार्यकर्त्यांसमवेत नाशिकच्या सिटी सेंटर मॉल येथील सेनेमॅक्स सभागृहात तान्हाजी चित्रपट बघितला
Chagan Bhujbal Watched Tanhaji Movie
Chagan Bhujbal Watched Tanhaji Movie

नाशिक  : राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री ना.छगन भुजबळ यांनी आपल्या व्यस्त शेड्युल मधून काल कार्यकर्त्यांसमवेत नाशिकच्या सिटी सेंटर मॉल येथील सेनेमॅक्स सभागृहात तान्हाजी चित्रपट बघितला. 

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व संरक्षण मंत्री ना. छगन भुजबळ यांनी विधानसभा निवडणुकीनंतर मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप कार्यक्रमात तसेच विविध प्रश्नांसंदर्भात राज्यभर दौरे केले. त्यानंतर गेल्या चार दिवसापासून नाशिक दौऱ्यावर असून त्यांनी आपल्या व्यस्त शेड्युल मधून वेळ काढत त्यांनी मनोरंजन आणि कार्यकर्त्यांसमवेत वेळ मिळावा यासाठी त्यांच्यासाठी आज तान्हाजी या चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन केले होते.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, आमदार माणिकराव कोकाटे, माजी आमदार जयवंतराव जाधव, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष डॉ.सयाजीराव गायकवाड, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, कोंदजीमामा आव्हाड, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, समाधान जेजुरकर, भालचंद्र भुजबळ, कैलास मुदलियार, महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, मनोहर कोरडे, यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com