chagan bhujbal warned girish mahajan about dam water | Sarkarnama

भुजबळांनी मंत्री महाजनांना इशारा देताच धरणाचे दरवाजे उघडण्याची तयारी 

संपत देवगिरे
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

नाशिक : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन,जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांना पत्राद्वारे "पाणी सोडता की धरणाचे दरवाजे उघडू' असा इशारा दिला. त्यानंतर मात्र जलसंपदा खाते सोमवारी पाणी सोडण्यास राजी झाले आहे. 

नाशिक : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन,जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांना पत्राद्वारे "पाणी सोडता की धरणाचे दरवाजे उघडू' असा इशारा दिला. त्यानंतर मात्र जलसंपदा खाते सोमवारी पाणी सोडण्यास राजी झाले आहे. 

दोन दिवसात पाणी न सोडल्यास शेतकऱ्यांसोबत धरणावर जाऊन धरणाचे दरवाजे खुले करण्यात येतील. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास यासाठी प्रशासन जबाबदार राहील असा इशारा भुजबळ यांनी दिला आहे. भुजबळ यांनी दि.15 नोव्हेंबर पासून पालखेड धरणातून आवर्तन देण्याची मागणी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे केली होती. 

मात्र अद्यापही आवर्तन न सोडल्यामुळे याबाबत ते आज जाब विचारणार होते. त्यानंतर जलसंपदा विभाग हलला. त्यांनी सोमवारी पाणी सोडण्याचे आदेस पारीत केले आहेत. त्यामुळे दुष्काळग्रस्तांना दिलासा मिळाला आहे. 

पालखेड डावा कालव्याच्या भरवशावर दिंडोरी, निफाड व येवला या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम केलेला आहे. शेतकऱ्यांनी प्रामुख्याने ठिबक सिंचनाचा वापर करून द्राक्ष, डाळिंब यासह इतर रब्बीची पिके घेतलेली आहे. येवला व निफाड तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केलेली आहे. 

कांदा हे नगदी पिक असल्याने पाण्याअभावी शेतकऱ्यांची अपरिमित हानी होत असून शेतकऱ्यांची उभी पिके जळू लागली आहे. येवला, निफाड तालुक्‍यासह मनमाड येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. हा आता राजकारणाचा विषय बनला आहे.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख