शिवभोजन शिजवणा-यांना छगन भुजबळांनी विचारले....सॅनीटायझर वापरता का रे?

मंत्री भुजबळ यांनी आज न सांगता शरदचंद्र पवार बाजार समितीच्या शिवभोजन केंद्राला भेट दिली. माजी खासदार समीर भुजबळ वाहन चालवत होते. शिवभोजन केंद्रावर गेल्यावर तेथील संचालक, कर्मचारी यांनी त्यांचे स्वागत केले
Chagan Bhujbal Visited ShivBhojan Cenre in Nashik
Chagan Bhujbal Visited ShivBhojan Cenre in Nashik

नाशिक  : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज बाजार समितीच्या शिवभोजन केंद्राला भेट दिली. थेट स्वयंपाकघरात जात अन्न शिजवणा-याला ते म्हणाले, ''सॅनीटायझर वापरतो का रे?. आधी मास्क लावत जा. हात धुवायला सांगा  नंतरच जेवण वाढत जा.''

मंत्री भुजबळ यांनी आज न सांगता शरदचंद्र पवार बाजार समितीच्या शिवभोजन केंद्राला भेट दिली. माजी खासदार समीर भुजबळ वाहन चालवत होते. शिवभोजन केंद्रावर गेल्यावर तेथील संचालक, कर्मचारी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी आधी केंद्रातील व्यवस्था, जेवण आदींची चौकशी केली. त्यानंतर ते थेट शेजारच्या स्वयंपाकघरात गेले.

स्वयंपाक करणा-याला इथे सॅनीटायझर आहे का?.तुम्ही सॅनीटायझर वापरता का?. असे प्रश्न विचारून चौकशी केली. माहिती घेतल्यावर ते म्हणाले, ''शेतकरी येथे लांबून येतात. त्यांना आधी हात धुवायला सांगा. अंतर ठेवायला सांगा. नंतरच वाढा.''  त्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्यांची विचारपूस केली. यावेळी माजी आमदार पंकज भुजबळ, जिल्हा पुरवठा अधिकारी आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com