गरीबांना धान्य पोहोचवा...शरद पवारांसमवेत छगन भुजबळांची चर्चा

लॉकडाउन'च्या काळातील उपाययोजनांसंदर्भात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केली. यावेळी या अडचणीच्या काळात जनतेची गैरसोय होऊ नये तसेच त्यांच्यापर्यंत धान्य, जीवनाश्‍यक वस्तू पोहोचविण्याबाबत चर्चा झाली
Chagan Bhujbal Updated Sharad Pawar about Food Distribution in Lock Down Period
Chagan Bhujbal Updated Sharad Pawar about Food Distribution in Lock Down Period

नाशिक : लॉकडाउन'च्या काळातील उपाययोजनांसंदर्भात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केली. यावेळी या अडचणीच्या काळात जनतेची गैरसोय होऊ नये तसेच त्यांच्यापर्यंत धान्य, जीवनाश्‍यक वस्तू पोहोचविण्याबाबत चर्चा झाली. राज्यात कुणीही उपाशी राहू नये म्हणून राज्याच्या अन्न-नागरी पुरवठा विभागाने उपाययोजना केल्याची माहिती भुजबळ यांनी दिली.

'कोरोना' संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर १ ते ३ एप्रिलला राज्यातील २८ लाख ६१ हजार ८५ शिधापत्रिकाधारकांना सहा लाख ९४ हजार क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्याचा उच्चांक गाठला. तसेच, अडकलेल्या स्थलांतरित एक लाख ६७ हजार शिधापत्रिकाधारकांनी राज्यात ते जेथे राहत आहेत, त्याठिकाणी सरकारच्या पोर्टबिलिटी यंत्रणेच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे. याविषयी अन्न व पुरवठा विभागाकडून केलेल्या उपाययोजनांची माहिती भुजबळ यांनी दिली.

''राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील पात्र रेशनकार्डधारकाने नियमित स्वस्त धान्य खरेदी केल्यानंतर कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला केंद्र सरकारच्या सूचनेनुसार पाच किलो अतिरिक्त तांदूळ मोफत देण्यात येईल. राज्यातील सात कोटी लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तीन दिवसांत तीन लाख ८३ हजार क्विंटल गहू, तीन लाख एक हजार क्विंटल तांदूळ, तीन हजार 564 क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले आहे. 'लाॅकडाउन'मध्ये काळाबाजार व अतिरिक्त भाववाढीच्या अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. जीवनावश्‍यक वस्तूंची साठेबाजी अथवा चढ्या दराने विक्री केल्यास सात वर्षांपर्यंत कैद होऊ शकते. याबाबत पुरवठा विभाग, वैध मापनशास्त्र विभाग व पोलिसांना संयुक्त कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत,'' अशी माहिती भुजबळ यांनी दिली.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com