chagan bhujbal speech in shrigonda | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

मी संपलेलो नाही कारण मी वाघाचा बच्चा आहे : छगन भुजबळ

संजय आ. काटे
बुधवार, 31 ऑक्टोबर 2018

दोन हात करायला तयार आहे.

श्रीगोंदे (नगर) : ''मारण्याची धमकीपत्रे ही निनावीच असतात. अशा पत्रांना भीक घालत नाही. वाघाचा बच्चा आहे. दोन हात करायला तयार आहे.  मी संपलो नाही, लढाई सुरूच राहणार'', अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सरकारवर हल्ला चढविला.

श्रीगोंदे येथे समता परिषदेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. भुजबळ म्हणाले, महाराष्ट्र सदन देखणे बांधले म्हणून मी आत, सदन उभे केले म्हणून त्यांच्या पोटात दुखते. ठेकेदाराला एक रुपयाही दिला नाही. आता मोदी, शहा तेथेच बैठका घेतात. भाजपनेते म्हणतात सदन सुंदर झाले. पण ज्यांनी बनविले त्याला आत पाठविले. माझे काही चुकले असल्यास फाशी द्या म्हणत होतो, पण खटला चालविण्याची धमक सरकार दाखवित नव्हते, अशी टीका त्यांनी केली.

आज पुन्हा मनुवाद उफाळतोय. घटना जाळली जाते. त्यावेळी कुणालाच पकडत नाहीत. आणि मनू जाळला की पोलिस कारवाई होते. मराठा, धनगर यांना आरक्षण मिळण्यासाठी कायदा करा. इतर निर्णय कायदे करून बदलता, मग आता काय झाले. घटनेला हात लावण्याची हिम्मत करू नका. तसे केल्यास जळून जाल, असा इशारा भुजबळ यांनी दिला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख