छगन भुजबळांनी बाजार समितीतील हमालांना वाढले शिवभोजन

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात काल शिवभोजन थाळीचे उद्‌घाटन झाले. यावेळी परिसरातील कार्यकर्ते, नागरीक, बाजार समितीतील मजूर, हमालांनी मोठी गर्दी केली होती. उद्‌घाटनानंतर कक्षातील हमालांना स्वतः अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी जेवण वाढले
Chagan Bhujbal Served Shivbhjan Thali to Porters
Chagan Bhujbal Served Shivbhjan Thali to Porters

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात काल शिवभोजन थाळीचे उद्‌घाटन झाले. यावेळी परिसरातील कार्यकर्ते, नागरीक, बाजार समितीतील मजूर, हमालांनी मोठी गर्दी केली होती. उद्‌घाटनानंतर कक्षातील हमालांना स्वतः अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी जेवण वाढले. यावेळी ते म्हणाले, "पोटभर जेवा, हे शिवभोजन आहे'' यावेळी उपस्थितांनी त्यांचे हात जोडून आभार मानले.

हवेत फुगे सोडून शिवभोजन थाळीचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी बाजार समितीतील उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्यानंतर कक्षाची फित कापून त्यांनी उद्‌घाटन केले. पहिल्या काही लाभार्थ्यांना स्वतः भुजबळांनी थाळी वाढली. यावेळी असलेली गर्दी, स्वतः जिल्हाधिकाऱ्यांकडून विचारपूस आणि मंत्र्यांनी भोजन वाढल्याने हे हमाल चांगलेच संकोचले होते. त्यांनी हात जोडून त्यांचे आभार मानले.

यावेळी भुजबळ यांनी गरीब, मजुरांची वर्दळ असलेल्या जिल्हा रुग्णालय, बाजारपेठा, बस व रेल्वे स्थानके, शासकीय कार्यालये या ठिकाणी 'शिवभोजन' थाळीच्या माध्यमातून केवळ दहा रुपयांत गरीब व गरजू जनतेची भूक भागणार आहे, असे सांगीतले. ते म्हणाले, ''शिवभोजन योजना गोरगरीबांसाठी अल्प दरात पोटभर जेवणाची महत्वकांक्षी योजना आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राज्यभर पन्नासहुन अधिक ठिकाणी शिवभोजन प्रकल्प सुरू होत आहे. जिल्हयामध्ये चार ठिकाणी प्राथमिक स्वरूपात त्याचे उदघाटन होत आहे. यात रोज सातशे नागरिकांना जेवण दिले जाईल.''

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील प्रेरणा महिला बचतगट संचलित बळीराजा रेस्टॉरंट येथे केंद्र सुरुझाले. यावेळी आमदार हिरामण खोसकर, माजी खासदार समीर भुजबळ, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, बाजार समिती सभापती शिवाजी चुंबळे, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पुरवठा उपायुक्त अर्जुन चिखले, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसिकर, पंचवटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक भगत, नगरसेवक गुरुमित बग्गा, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संपत सकाळे, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे, विष्णुपंत म्हैसधूने, भालचंद्र भुजबळ, प्रेरणा महिला बचतगटाच्या अध्यक्ष कविता कर्डक, बाळासाहेब कर्डक, डॉ.शेफाली भुजबळ आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com