Chagan Bhujbal Samata Parishad | Sarkarnama

समता परिषदेला छगन भुजबळांची चिंता

संपत देवगिरे
सोमवार, 24 एप्रिल 2017

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्याविरोधात अंमलबजावणी संचलनालयाने खटला दाखल करुन अटक केली आहे. याबाबत परिषदेकडून सातत्याने प्रश्र्न उपस्थित करण्यात आला आहे. यासंदर्भात नगर तसेच नाशिक येथे नुकत्याच झालेल्या समता परिषदेच्या बैठकीतही याविषयी चिंता व्यक्त करण्यात आली.

नाशिक - 'सध्याचे सरकार इतर मागासवर्गीय घटकांची अवहेलना आणि दुर्लक्ष करीत आहे. ओबीसींचे नेते छगन भुजबळ यांच्याविषयी राजकीय सापत्न भाव ठेवत आहे. त्यामुळे आम्हाला त्याची चिंता वाटते',अशी चर्चा अखिल भारतीय समता परिषदेच्या नेत्यांनी पुन्हा एकदा सुरु केली आहे.

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांच्याविरोधात अंमलबजावणी संचलनालयाने खटला दाखल करुन अटक केली आहे. याबाबत परिषदेकडून सातत्याने प्रश्र्न उपस्थित करण्यात आला आहे. यासंदर्भात नगर तसेच नाशिक येथे नुकत्याच झालेल्या समता परिषदेच्या बैठकीतही याविषयी चिंता व्यक्त करण्यात आली.

केंद्र व राज्य शासनाने अनुसुचित जाती आणि जमातींची जनगणना पूर्ण करुन त्याची आकडेवारी जाहीर केली. खासदार समीर भुजबळ यांच्या पुढाकाराने ओबीसी जनगणना सुरु करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर राज्यात तसेच केंद्रात सरकार बदलल्याने त्यांनी ते काम थांबविले आहे. त्यामुळे इतर मागासवगीर्य समाजाची नेमकी स्थिती, अडचणी मांडण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे देशातील इतर मागासवर्गीय समाजाची जनगणना तातडीने सुरु करावी अशी मागणी विविध नेत्यांनी केली आहे. डाॅ. कैलास कमोद यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या य़ा चचेर्त राज्यभरातील नेते उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचीत नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख