शरद पवार सगळ्यांसाठी कार्यरत म्हणूनच जाणते राजे : छगन भुजबळ 

शरद पवार सगळ्यांसाठी काम करतात. सगळ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यामुळे ते जाणता राजा आहेतच, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी येथे केले
Chagan Bhujbal Praises Sharad Pawar
Chagan Bhujbal Praises Sharad Pawar

नाशिक  : शरद पवार सगळ्यांसाठी काम करतात. सगळ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यामुळे ते जाणता राजा आहेतच, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी येथे केले.

रयत शिक्षण संस्थेच्या येथील शाळेचे उद्घाटन  राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास श्री भुजबळ उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी वार्तालाप झाला. यावेळी ते बोलत होते. जाणता राजा असे शरद पवार यांना संबोधले जाते. यासंदर्भात थेट नामोल्लेख न करता माजी खासदार उदयनराजे यांनी टिका केली होती. यासंदर्भात भुजबळांनी हे वक्तव्य केले.

सध्या कोणत्याही विषयाची चर्चा भरकटते.  माझं सगळ्या राजकारण्यांना आवाहन आहे, की तिळ गूळ घ्या आणी गोड गोड बोला आणि हा वाद संपवा, असे भुजबळ म्हणाले. ते पुढे म्हणाले, ''मागचं सरकार केव्हाही जीआर काढायचे आणि रद्दही करायचे. केंद्र सरकारनं आश्रमशाळांना डाळ, तांदूळ अनुदान बंद केलं. आता विद्यार्थ्यांना थेट पैसे देणार असे  म्हणताहेत.  ते काहीही निर्णय घेतात. कार्यवाही व त्यांचे परिणाम याचाही विचार करत नाहीत,"
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com