छगन भुजबळांच्या संगीतमय योगासनांनी उपस्थित झाले चकीत! - Chagan Bhujbal Perfomed yoga on tune of music | Politics Marathi News - Sarkarnama

छगन भुजबळांच्या संगीतमय योगासनांनी उपस्थित झाले चकीत!

संपत देवगिरे 
रविवार, 12 जानेवारी 2020

प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाने येवला येथे शनिवारी सायंकाळी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला छगन भुजबळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी युवक व उपस्थितासांठी संगीत योगा कार्यक्रम झाला त्यात भुजबळही सहभागी झाले होते

नाशिक : अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आक्रमक नेते, प्रभावी वक्ते म्हणून सबंध महाराष्ट्राला परिचीत आहेत. मात्र, शनिवारी त्यांनी आपल्या मतदारसंघातील संगीतमय योगासनांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने चक्क व्यासपीठावर युवकांसमवेक संगीतमय योग केला. उपस्थितांतील अनेकांना जे जमले नाही ते भुजबळ यांनी लिलया केल्याने त्यांची व्यायामाची आवड या निमित्ताने चर्चेचा विषय ठरली.

प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाने येवला येथे शनिवारी सायंकाळी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी युवक व उपस्थितासांठी संगीत योगा कार्यक्रम झाला. नागरीकांनी आपल्या आरोग्याला प्राधान्य द्यावे. नियमीत योगासने करावीत असा संदेश देण्यासाठी संस्थेने हा कार्यक्रम केला होता. मात्र कार्यक्रमाच्या 'आरोग्यम धनसंपदा' या उक्तीप्रमाणे केवळ भाषण देऊन न थांबता छगन भुजबळ प्रत्यक्ष योगाच्या कार्यक्रमातही सहभागी झाले. त्यांनी युवकांसमवेत योग केला. आपण स्वतः नियमितपणे जेव्हा जेव्हा शक्‍य असेल तेव्हा योगासने करतो. आरोग्यासाठी ते आवश्‍यक आहे असे त्यांनी सांगीतले.

मुंबईच्या राजकारणात आपला प्रभाव निर्माण करतांना छगन भुजबळ यांनी त्याला साजेशे व्यक्तीमत्व देखील घडवले आहे. त्यादृष्टीने त्यांनी अनेक प्रयोग केल्याचे कार्यकर्त्यांना ठाऊक आहेत. चित्रपट निर्मीतीपासून तर चित्रपटात अभिनय देखील केला आहे. महाराष्ट्र -कर्नाटक सीमा वादाच्या आंदोलनात प्रवेशबंदी असतांना ते चक्क वेगळा वेष करुन बेळगावला दाखल होत कर्नाटक सरकारला धक्क दिला होता. नाशिकला राम रथयात्रेत सहभागी होण्यास बंदी असताना वेषांतर करुन ते त्यात सहभागी होत पोलिसांनाही त्यांनी चकवा दिला होता. अनेकदा आपल्या शैलीदार भाषणात ते अनेक नेत्यांची मिमिक्री करतात. हे सर्व नवे नाही. मात्र, सत्तरीतही आरोग्याच्या समस्या असताना त्यांची आजही व्यग्र दिनचर्या असते. त्याचे रहस्य त्यांच्या व्यायामाच्या आवडीत आहे, हे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.

या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार नरेंद्र दराडे, अंबादास बनकर, आमदार किशोर दराडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनावणे, सभापती संजय बनकर, सभापती सुरेखा दराडे, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काळे, सदस्य साविता पवार, कमल आहेर, पंचायत समिती सभापती जयदत्त होळकर, सरपंच चंद्रकला नाईकवाडी, अरुण थोरात आदी उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख