छगन भुजबळ, लाल टी शर्ट आणि सॅनिटायझर

कोरोना विरोधात संपूर्ण राज्य शासन गेली काही दिवस अत्यंत गांभीर्याने काम करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेल्या जनता कर्फ्यू मध्ये अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ सहभागी झाले. आज भुजबळ देखील घरीच थांबून काम करीत होते
Chagar Bhujbal Reading at Home on Janta Curfew Day
Chagar Bhujbal Reading at Home on Janta Curfew Day

नाशिक : कोरोना विरोधात संपूर्ण राज्य शासन गेली काही दिवस अत्यंत गांभीर्याने काम करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेल्या जनता कर्फ्यू मध्ये अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ सहभागी झाले. आज भुजबळ देखील घरीच थांबून काम करीत होते. लाल टी-शर्ट, करडी पॅंट परिधान केलेल्या रिलॅक्‍स भुजबळांनी यशवंतराव चव्हाणांवरील पुस्तक वाचले. येणाऱ्यांना ते भेटत होते मात्र आधी सॅनिटायझर देऊन मगच !

श्री. भुजबळ यांचे निवासस्थान अन्‌ संपर्क कार्यालय असलेल्या भुजबळ फार्म येथे एरव्ही कार्यकर्ते, नागरीकांचा राबता असतो. स्वतः भुजबळ असल्यावर तर तेथे अनेकदा तोबा गर्दी असते. स्वतः भुजबळ येणाऱ्या प्रत्येकाला आवर्जुन भेटतात. आजचा दिवस त्याला अपवाद ठरला. गेले दोन दिवस भुजबळ नाशिकला आहेत. या कालावधीत त्यांनी विविध विभाग व अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन कोरोना विषयी उपाययोजनांविषयी सुचना केल्या. 

आज मात्र सकाळपासून ते घरीच थांबले होते. जनता कर्फ्यू मुळे एरव्ही बहुतांश मंडळी घरीच थांबल्याने त्यांच्याकडे गर्दी नव्हती. त्यामुळे एरव्ही सार्वजनिक जीवनात वावरतांना असलेली बंधने नव्हती. त्यामुळे करड्या रंगाची पॅंट आणि लाल टिशर्ट या वेषात अन्‌ रिलॅक्‍स मुडमध्ये ते होते. एरव्ही त्यांना क्वचितच त्या कपड्यांत पोहिलेले असल्याने अनेकांना हा त्यांचा हटके लुक अनेकांना आश्चर्याचा धक्का देऊन गेला.

भुजबळांनी आपल्या घरुनच अधिकारी, विविध विभागांशी संपर्क करुन माहिती घेतली. गरज असेल तिथे सुचनाही ते करीत होते. मात्र कामाचा ताण नसल्याने ते वेळ मिळेल तसे यशवंतराव चव्हाण यांचे पुस्तक वाचत होते. येणाऱ्यांनाही भेटत होते, मात्र आधी येणाऱ्यांना सॅनिटायझर देत होते. सॅनिटायझरचा वापर आवश्‍यक असल्याचे आवर्जून सांगत होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com