छगन भुजबळ विरोधक म्हणाले....आम्ही अजित पवार समर्थक, राष्ट्रवादीतच!

विधानसभेला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे छगन भुजबळ यांच्या विरोधात शिवसेनेचे सर्व नेते अन्‌ त्यांच्या साथीला राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील माणिकरावशिंदे व त्यांचे सहकारी असे चित्र होते. त्यात भुजबळ यांनी एकतर्फी विजय संपादन केला. मतदारसंघात भुजबळ विरुध्द शिवसेना असे चित्र होते. मात्र गेल्या आठवडयात वेगाने घडलेल्या राजकीय घडामोडींत शिवसेना, दोन्ही कॉंग्रेस एकत्र येत महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले. त्यात पहिल्याच टप्प्यात श्री. भुजबळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे येवल्यात काय घडणार याची उत्सुकता होती.
Chagan Bhujbal Opponent Manikrao Shinde Says He is Still in NCP
Chagan Bhujbal Opponent Manikrao Shinde Says He is Still in NCP

नाशिक : येवला मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते माणिकराव शिंदे यांनी मोठे बंड केले होते. भुजबळांविरोधात उमेदवारीची मागणी करीत थेट शिवसेनेच्या व्यासपीठावर जाऊन काम केले होते. मात्र, राज्यात नवी समिकरणे उदयास येऊन छगन भुजबळ अनपेक्षीतपणे मंत्री झाले. या पार्श्‍वभूमीवर श्री. शिंदे म्हणाले, "मी अजित पवार समर्थक आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातच राहणार'' त्यामुळे येवल्यात वेगळेच राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत.

नामांकित अमूल कंपनीकडून दुधसंकलन होणार आहे. त्यासाठी येवल्यातील तालुका दुध संघाच्या शितकरण व प्रक्रिया प्रकल्पाचे उद्‌घाटन श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी अनेक भुजबळ विरोधक एका व्यासपीठावर आले होते. विधानसभेला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे छगन भुजबळ यांच्या विरोधात शिवसेनेचे सर्व नेते अन्‌ त्यांच्या साथीला राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील श्री. शिंदे व त्यांचे सहकारी असे चित्र होते. त्यात भुजबळ यांनी एकतर्फी विजय संपादन केला. मतदारसंघात भुजबळ विरुध्द शिवसेना असे चित्र होते. मात्र गेल्या आठवडयात वेगाने घडलेल्या राजकीय घडामोडींत शिवसेना, दोन्ही कॉंग्रेस एकत्र येत महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले. त्यात पहिल्याच टप्प्यात श्री. भुजबळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे येवल्यात काय घडणार याची उत्सुकता होती.

शिवसेनेचे आमदार किशोर दराडे, सहकार नेते अंबादास बनकर, श्री. शिंदे, मजूर फेडरेशनचे अध्यक्ष संभाजी पवार, भाजपा नेते विक्रम गायकवाड आदी एकत्र आले होते. त्यावर राजकीय गुगली टाकत शिंदे यांनी तीन पक्ष एकत्र आल्याने यापुढे सर्वच कार्यक्रमांना मोठे व्यासपीठ लागेल. त्याची काळजी घ्या, असे सांगत ''मी मात्र राष्ट्रवादीतच असून अजितदादा समर्थक आहे. आमदार दराडे बंधूनी शेतकऱ्यांना या व्यवसायाला चालना देण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध केले आहे. हवे तर त्यांनी आणखी एक मंत्रीपदही आणावे. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत,'' असे ते म्हणाले.

या कार्यक्रमाला भुजबळ समर्थक जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, उपनगराध्यक्ष सुरज पटणी, माजी नगराध्यक्ष पंकज पारख, नगरसेवक गणेश शिंदे, प्रमोद सस्कर, साहेबराव सैद, राष्ट्रवादीचे गटनेते मोहन शेलार आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com