छगन भुजबळांमुळे पाच वर्षानंतर नाशिकला होणार नाशिक फेस्टीव्हल!

गेली पाच वर्षे गिरीष महाजन जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यांच्या कारकिर्दीत माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या काही महत्वाकांक्षी प्रकल्पांना थंड बासणात ठेवण्यात आले होते. यातील काही प्रकल्पांचे साहित्य तर अन्य जिल्ह्यात पळविण्यात आले होते. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यावर छगन भुजबळ नाशिकचे पालकमंत्री झाले. त्यानंतर लगेचच त्यांनी या प्रकल्पाचा आढावा घेऊन माहिती सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या
Chagan Bhujbal May Start Nashik Festival Again
Chagan Bhujbal May Start Nashik Festival Again

नाशिक : माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या कारकिर्दीत छगन भुजबळ यांचे विविध महत्वांकाक्षी प्रकल्प थंड बस्त्यात गेले होते. आता ते मार्गी लागणार आहेत. नियोजन मंडळाच्या बैठकीत हे प्रकल्प मार्गी लावण्याचा निर्णय झाला. त्यासाठी 34 कोटींच्या अतिरिक्त मागणीस मान्यता देण्यात आली. विशेष म्हणजे यानिमित्ताने नाशिकमध्ये चित्रपट तारे-तारकांचा सहभाग असलेला नाशिक फेस्टीव्हल होण्याचीही शक्‍यता आहे.

गेली पाच वर्षे गिरीष महाजन जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यांच्या कारकिर्दीत माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या काही महत्वाकांक्षी प्रकल्पांना थंड बासणात ठेवण्यात आले होते. यातील काही प्रकल्पांचे साहित्य तर अन्य जिल्ह्यात पळविण्यात आले होते. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यावर छगन भुजबळ नाशिकचे पालकमंत्री झाले. त्यानंतर लगेचच त्यांनी या प्रकल्पाचा आढावा घेऊन माहिती सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. 

आज जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठक यासंदर्भात विशेष आर्थिक मागणीपत्राला मान्यता देण्यात आली. यामध्ये बोट क्‍लबसाठी 1 कोटी, गंगापूर धरणाच्या पायथ्याशी प्रस्तावित असलेल्या "कलाग्राम'साठी 7 कोटी, छत्रपती शिवाजी स्टेडीयम येथे क्रिडा संकुलासाठी 20 कोटी, अंजनेरी येथे साहसी क्रिडा संकुल उभारण्यासाठी 1 कोटी आणि नाशिक जिल्ह्याची स्थापना होऊन 150 वर्षे झाल्याने विविध उपक्रमांसाठी 5 कोटींचा निधी प्रस्तावित करण्यात आला. या 34 कोटींच्या अतिरिक्त मागणीला मान्यता देण्यात आली. पुढील आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रस्तावित दौरा आहे. त्यात त्याला मान्यता अपेक्षीत आहे.

छगन भुजबळ नाशिकचे राज्याचे पर्यटनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री असतांना विभागाच्या पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी त्यांनी विविध प्रकल्प प्रस्तावित केले होते. त्यांच्या कामालाही सुरवात झाली होती. यामध्ये नाशिकच्या गंगापूर धरणालगत कलाग्राम उभारणी, पर्यटन व यात्री निवास उभारणे, धरणात बोट क्‍लब निर्माण करणे याला मंजुरी दिली होती. अमेरिकेहून जगातील सर्वाधिक अत्याधुनिक व प्रदूषणमुक्‍त पन्नास बोटी 2013 मध्ये नाशिकला आणल्या होत्या. राज्यात भाजपचे सरकार आल्यावर यातील अनेक प्रकल्प बासणार बांधण्यात आले होते. यातील काही प्रकल्प विलंबामुळे बंद झाले. जयकुमार रावल पर्यटनमंत्री असल्याने त्यांनी नाशिकच्या बोटी आपल्या मतदारसंघात नेल्या होत्या. त्यामुळे मंत्री नाशिकचे मात्र विकास भलतीकडेच अशी स्थिती होती. हे चित्र छगन भुजबळ यांनी कार्यभार घेताच अवघ्या दोन आठवड्यात बदलले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com