#FightWithCorona युवकांनी बनवले सॅनिटायझर; भुजबळांनी दिला दोन तासांत परवाना - Chagan Bhujbal Gave Sanitizer Production permission Two Hours | Politics Marathi News - Sarkarnama

#FightWithCorona युवकांनी बनवले सॅनिटायझर; भुजबळांनी दिला दोन तासांत परवाना

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 25 मार्च 2020

नाशिकच्या युवकांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांवर उतरणारे सॅनीटायझर तयार केले. त्याच्या परवान्याची अडचण घेऊन हे संबंधीत युवक मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे गेले असता, अवघ्या त्यांनी दोन तासांत त्याची परवानगी मिळवून दिली

नाशिक : कोरोना विरोधातील लढाईत राज्यातील युवक आणि राज्य शासन किती वेगाने काम करीत आहे याचे एक उदाहरण नुकतेच समोर आले आहे. नाशिकच्या युवकांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांवर उतरणारे सॅनीटायझर तयार केले. त्याच्या परवान्याची अडचण घेऊन हे संबंधीत युवक मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे गेले असता, अवघ्या त्यांनी दोन तासांत त्याची परवानगी मिळवून दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी हे सॅनिटायझर नाशिक, पुणे, सातारा यांसह विविध शहरातं उपलब्ध देखील झाले.

याबाबतची माहिती अशी की इंडियान केमीकल इस्टीट्यूटच्या क्रांतीसागर मोरे या युवकाने जागतिक आरोग्य संघटनेचे मानांकन असलेल्या सॅनिटायझरचा फॉर्मूला तयार केला. नाशिकचे युवराज पाटील यांच्या सनरेझीया या कंपनीने त्याचे उत्पादन करण्याची तयारी दर्शविली. नाशिकच्या सुरगाणा संस्थानचे (कै) धैर्यशीलराजे पवार यांच्या कुटुंबातील सोनालीराजे पवार यांनी त्याची मार्केटींग करण्याची तयारी दर्शवली. 

सध्या कोरोना संसर्ग वाढलेला असल्याने सॅनिटायझरचा मोठा तुटवडा आहे. या पार्श्‍वभूमीवर या युवकांच्या कल्पकतेतून हा तोडना पुढे आला होता. मात्र त्याला शासकीय परवाना आवश्‍यक होता. तिथे त्यांची गाडी अडली. तेव्हा हे सर्वजण राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री चगन भुजबळ यांच्याकडे गेले. त्यांनी अडचण सांगीतल्यावर भुजबळांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावले. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी आणि अन्न व औषध प्रशासनाच्या उपायुक्तांकडे विषय सोपवून तातडीने परवाना देण्याच्या सूचना दिल्या.

अन्न व औषध प्रशासनाने सध्याच्या स्थितीत हा तातडीचा विषय म्हणून त्यावर कार्यवाही करून रात्री साडे दहाला त्यांना हा परवाना सुपुर्त केला. परवाना मिळाल्यावर त्यांचे चाचणी उत्पादन लगेच सुरु झाले. सकाळी त्यांनी या "स्वीगी' नावाच्या सॅनीटायझरची पहिली बाटली मंत्री भुजबळ यांना दिली. आता पुढील कायदेशीर प्रक्रीया झाल्यावर येत्या एक दोन दिवसांत हे उत्पादन बाजारात येईल. यानिमित्ताने वॅर हेडवर काय काय व किती वेगाने काम होते, एखाद्या संकटाला किती कल्पकता व धैर्याने सामोरे जावे याचा आदर्श प्रशासनाने घालून दिल्याचे छगन भुजबळ यांनी सांगीतले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख