#CoronaEffect मुळे दोनच मिनिटांत भुजबळांनी कार्यक्रम आटोपला

मुख्यमंत्र्यांनी कोरोना वायरसचा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश दिले खरे. मात्र भुजबळ यांनी नूतन इमारत आणि महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. त्यामुळे भुजबळ यांनी मुख्यमंत्र्याच्या आदेशाला केराची टोपरी दाखवल्याची चर्चा रंगली
Chagan Bhujbal finished Pune program in Two Minutes due to Corona
Chagan Bhujbal finished Pune program in Two Minutes due to Corona

हडपसर : कोरोना प्रतिबंधक साहित्याचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा राज्याचे अन्न व पाणीपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी हडपसर येथे बोलताना दिला. ससाणे एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंगलिश स्कूलच्या ज्युनिअर कॉलेजच्या नवीन इमारतीचे उदघाटन व महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण भुजबळ यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ दोन मिनिटांतच भुजबळ यांनी कार्यक्रम उरकला. 

मुख्यमंत्र्यांनी कोरोना वायरसचा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश दिले खरे. मात्र भुजबळ यांनी नूतन इमारत आणि महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. त्यामुळे भुजबळ यांनी मुख्यमंत्र्याच्या आदेशाला केराची टोपरी दाखवल्याची चर्चा रंगली. तर संस्थेचे सदस्य अजित ससाणे यांनी या कार्यक्रमाची प्रसिध्दी होवू नये यासाठी पत्रकारांना हाकलून दिले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. 

याप्रसंगी ज्येष्ठ विचारवंत हरी नरके, आमदार चेतन तुपे, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार योगेश टिळेकर, महादेव बाबर, जगन्नाथ शेवाळे, नगरसेवक वैशाली बनकर, योगेश ससाणे, नगरसेवक मारुती तुपे, पूजा कोद्रे, उज्वला जंगले, अशोक कांबळे, माजी नगरसेवक दत्तोबा शिंदे, विजया वाडकर, फारूक इनामदार, सुनिल बनकर, बाळासाहेब गोंधळे, जयसिंग गोंधळे उपस्थित होते. 
या कार्यक्रमाचे संयोजन ससाणे एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष गोरखनाथ ससाणे, बाळासाहेब ससाणे, सागर ससाणे, मंगेश ससाणे, विजय ससाणे, प्राचार्य शोभा नायर, प्राचार्य भानुमती नायडू व शिक्षकांनी केले.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com