शहीद जवान दिंगबर शेळकेंच्या मृत्यूची चौकशी करा :छगन भुजबळ

मानोरी (येवला) येथील सीआरपीएफचे शहीद जवान दिंगबर शेळके यांच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.
nashik Jawan
nashik Jawan

नाशिक  :  मानोरी (येवला) येथील सीआरपीएफचे शहीद जवान दिंगबर शेळके यांच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे  लेखी पत्राद्वारे केली आहे.

या विषयावर नागरिकांनी रास्ता रोको केला. त्यात शिवसेनेचे संभाजी पवार यांसह सर्व राजकीय पक्षांचे नेते सहभागी झाले.

यासंदर्भात जिल्हाधिका-यांनी लिखीत आश्वासन दिल्यावर जवान शेळके यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत भुजबळ यांनी पत्रात म्हटले आहे की, येवला (जि.नाशिक) तालुक्यातील मानोरी येथील  दिंगबर शेळके या सीआरपीएफ जवानाचा आसाममधील तेजपूर येथे मृत्यू झाल्याचे रविवारी (२४ सप्टेंबर) पहाटेच्या सुमारास निदर्शनास आले. सदर मृत्यू आत्महत्या असल्याचे प्रशासनाने शेळके कुटुंबियांना  कळवले आहे.  मात्र ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप दिगंबर शेळके यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.  या प्रश्नावर सर्वच राजकीय, सामाजिक कार्यकर्ते एकत्र आले होते.

दरम्यान आज येथील ग्रामस्थांनी एकत्र येत मुखेड फाट्यावर रस्ता रोको करत सदर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. याबाबत त्यांनी केंद्रीय गृहविभागाकडे पत्रव्यवहार देखील केलेला आहे. आसाममध्ये तेजपूर येथे सीआरपीएफ कॅम्प येथील तुकडी नंबर ओसीई -३० बटालियन मध्ये स्टोअर विभागात कार्यरत होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com