मोदींच्या पुस्तकावर छगन भुजबळ संतापले, "भाटगिरीला काही मर्यादा आहे की नाही?'

...
chagan bhujbal criticizes modi supporters for comparing modi with shivaji
chagan bhujbal criticizes modi supporters for comparing modi with shivaji

नाशिक ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणारे "आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' या जयभगवान गोयल यांच्या पुस्तकावर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ चांगलेच संतापले आहेत. किती भाटगिरी करावी याला काही मर्यादा आहे की नाही? असा प्रश्‍न करीत या ुपस्तकावर तातडीने बंदी घालावी अशी मागणी त्यांनी केली.

या संदर्भात ते म्हणाले, ``नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणे म्हणजे शुद्ध वेडेपणा आहे. एखाद्याने किती भाटगिरी करायची याला काही मर्यादा असतात. याआधी देखील नरेंद्र मोदींची तुलना प्रभू रामचंद्राशी करण्यात आली होती. शिवाजी महाराजांच्या नावावर मते मागायची आणि आता त्यांच्याशी तुलना करायची हे संतापजनक आहे.

ते म्हणाले, ``छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले परत घेतले. नरेंद्र मोदीनीकाय पाकव्याप्त काश्‍मीर घेतले काय?. शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यावर प्रचंड प्रेम केले. यांच्या राज्यात आता शेतकरी मरत आहेत. या पुस्तकाविषयी कळल्यावर माझा संताप झाला. किरकोळ गोष्टींवर देखील प्रतिक्रीया देणाऱ्या मोदींच्या अनुयायांनी हे योग्य आहे का? याविषयी बोलावे.`` या पुस्तकावर बंदी आणली पाहिजे अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com