आजचा वाढदिवस : छगन भुजबळ, माजी उपमुख्यमंत्री  - Chagan Bhujbal birthday | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

आजचा वाढदिवस : छगन भुजबळ, माजी उपमुख्यमंत्री 

संपत देवगिरे
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

आजचा वाढदिवस - छगन भुजबळ जन्म  १५ ऑक्टोबर, १९४७

राजकारणासह विविध क्षेत्रात वावर असलेल्या भुजबळ यांनी चित्रपट क्षेत्रातही कारकिर्द केली. या कौशल्याचा वापर ते राजकारणातही करतात. नाशिकला रामरथावर बंदी घातल्यावर तसेच कर्नाटक सीमा प्रश्‍नावर बेळगाव मध्ये आंदोलनात त्यांनी वेषांतर करुन पोलिसांना चकवा दिला होता. त्यांची भाषणाची खास शैली आहे. या शैलीत खुमासदार भाषणे करुन त्यांनी अनेक सभा गाजवल्या आहेत. 

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. त्यांनी आपली राजकीय कारकीर्द शिवसेनेतून सुरु केली. 1973 मध्ये ते मुंबई नगरसेवक म्हणुन निवडून गेले. 1973 ते 84 महापालिकेत विरोधी पक्षनेते, 1985 मध्ये मुंबईचे महापौर झाले. त्याचवर्षी माझगाव मतदारसंघाचे आमदार झाले. मंडल आयोग प्रश्‍नावर त्यांचे शिवसेनेशी मतभेद झाले व त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 1999 मध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना केली. ते या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बनले. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते, काँग्रेस आघाडीच्या सरकारमध्ये 1999 मध्ये ते उपमुख्यमंत्री बनले. 2004 पासून ते येवला (नाशिक) मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. 1 नोव्हेंबर, 1992 रोजी त्यांनी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची स्थापना केली. ओबीसी चळवळीचे नेते म्हणुन त्यांची विशेष ओळख आहे. 

2016 मध्ये त्यांच्या विरोधात महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणात 'इडी'ने कारवाई केली होती. त्यासाठी त्यांना सुमारे अडीच वर्षे तुरुंगात काढावी लागली. सध्या ते जामीनावर बाहेर आहेत. तो खटला अद्याप सुरु आहे.  

विविध क्षेत्रात वावर असलेल्या भुजबळ यांनी चित्रपट क्षेत्रातही कारकिर्द केली. या कौशल्याचा वापर ते राजकारणातही करतात. नाशिकला रामरथावर बंदी घातल्यावर तसेच कर्नाटक सीमा प्रश्‍नावर बेळगाव मध्ये आंदोलनात त्यांनी वेषांतर करुन पोलिसांना चकवा दिला होता. त्यांची भाषणाची खास शैली आहे. या शैलीत खुमासदार भाषणे करुन त्यांनी अनेक सभा गाजवल्या आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख