sarkarnama breaking आता चर्चा थांबणार : छगन भुजबळ राष्ट्रवादीच्या बैठकीला उपस्थित राहणार

sarkarnama breaking आता चर्चा थांबणार : छगन भुजबळ राष्ट्रवादीच्या बैठकीला उपस्थित राहणार

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक आज (शुक्रवारी) दुपारी दोन वाजता पुण्यातील बारामती होस्टेल येथे होणार असून या बैठकीला राष्ट्रवादीचे बाहुबली नेते आणि शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरू असणारे नेते छगन भुजबळही उपस्थित राहणार आहेत. भुजबळ यांच्या उपस्थितीमुळे राष्ट्रवादी सुटकेचा निश्वास टाकणार आहे.

भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा राहून राहून होत असताना आज पुण्यात होणाऱ्या राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीला भुजबळ उपस्थित राहणार की नाही, याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. या मुळे राष्ट्रवादीची धाकधूकही चांगलीच वाढली होती.

मात्र `सरकारनामा` खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भुजबळ गुरुवारी रात्रीच पुण्यात मुक्कामी दाखल झाले असून ते कोअर कमिटीच्या बैठकीला उपस्थिती लावणार आहेत.

भुजबळ राष्ट्रवादीच्या मुख्य प्रवाहापासून काहीसे अलिप्त असल्याचे चित्र असताना ते शिवसेनेत जाणार अशी चर्चा होती. दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांच्या नाशिकमधील दौऱ्यातही भुजबळ सहभागी झाले नव्हते. त्यामुळे ते सेनेते जातील अशी अटकळ बांधली जात होती. मात्र भुजबळ यांच्या प्रवेशामुळे सेनेतील अंतर्गत धुसफुस मातोश्रीपर्यंत पोहोचली होती. सेना नेत्यांच्या तीव्र विरोधामुळेच ही भुजबळ यांचा संभाव्य प्रवेश थांबला गेला, अशीही चर्चा आहे.  शिवसेना प्रवेशाच्या वारंवार होणाऱ्या चर्चेने भुजबळही वैतागले होते. त्यांनी याबाबत देवालाच विचारा, असे माध्यमांना सांगून उद्वेगही व्यक्त केला होता. तरी या चर्चा थांबत नव्हत्या. मात्र आजच्या कोअर कमिटीच्या बैठकीला हजेरी लावत भुजबळ यांनी राष्ट्रवादीत पुन्हा सक्रिय होण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीवरील संभाव्य विघ्न तरी तूर्तास टळले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com