छगन भुजबळांना जुने मित्र भेटले पण; अजितदादा नसल्याचे मनाला टोचले

हाॅटेल ट्रायडेंटमध्ये तीन पक्षांच्या नेत्यांचै बैठक झाली. त्यात उद्धव ठाकरे यांची नेता म्हणून निवड झाली.
chagan bhujbal about ajit pawar
chagan bhujbal about ajit pawar

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची महाराष्ट्र विकास आघाडीचा नेता म्हणून निवड झाल्यानंतर अनेक नेत्यांनी या बैठकीत जोरदार बॅटिंग केली. या बैठकीत आभार मानतात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी माझा प्रवास हा शिवसेना, काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस, अशा तीनही पक्षांत झाल्याने मला माझे अनेक जुने मित्र भेटले, अशी प्रतिक्रिया दिली. त्यांच्या या प्रतिक्रियेवर हशा पिकला.

त्यानंतर भुजबळ हे गंभीर होऊन त्यांनी या सगळ्या उपस्थितीत एका नेत्याची अनुपस्थिती मला टोचते आहे. हा नेता म्हणजे अजित पवार. राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या स्थापनेपासून पक्षवाढीसाठी त्यांनी रात्रंदिवस काम केले आहे. ते येथे नसणे कोणत्याही कार्यकर्त्याला रुचणार नाही, असे सांगितले. त्यांच्या वाक्यानंतर अजित पवार जिंदाबादच्या घोषणा उपस्थितांनी दिल्या.

यावर बोलताना भुजबळ यांनी अजितदादा यांना परत आणण्याचे काम आम्ही करू. पवार साहेब यांनी परवानगी द्यावी, अशी विनंती त्यांनी केली. अजितदादांनी राजीनामा दिल्यामुळे फडणवीस यांना राजीनामा द्यावा लागला, याची आठवण भुजबळ यांनी या वेळी करून दिली. 

या वेळी शरद पवार, उद्धव ठाकरे यांचीही भाषणे झाली. उद्धव यांनी सोनिया गांधी आणि शरद पवार यांचे आवर्जून आभार मानले. शिवसेनेला मुख्यमंत्रिपद कबूल केले नव्हते, असे वाक्य देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा उच्चारल्याने अनेक इंगळ्या मनाला डसल्याचे त्यांनी सांगितले. ज्यांनी तीस वर्षे मैत्री केली त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला नाही. मात्र ज्यांच्याशी मी संघर्ष केला त्यांनी माझ्या नावाला पाठिंबा दिला, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. नवी दिल्लीतील माझ्या मोठ्या भावाला मी भेटणार आहे, असे सांगत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही टोला लगावला. मोदी यांनी प्रचारसभेत उद्धव यांना माझे छोटे भाऊ म्हणून उल्लेख केला होता. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com