छगन भुजबळांना शिवसेनेत प्रवेश नाही : उद्धव ठाकरे 

chagan bhujabal no entry in shivsena udhav thackrey
chagan bhujabal no entry in shivsena udhav thackrey

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना कदापी शिवसेनेत प्रवेश दिला जाणार नाही असे आश्‍वासन शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिकमधील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे. 

गेल्या काही दिवसापासून भुजबळ हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याबाबत खुद्द भुजबळ यांनी खुलासा करताना म्हटले होते की मी येवल्यात आहे आणि पक्षाच्या कामात व्यस्त आहे. त्यामुळे शिवसेनेत प्रवेश करण्याचा प्रश्‍नच नाही.

तरीही या प्रवेशाबाबत चर्चा थांबली नाही. मध्यंतरी शिवसेनेतील एका नेत्याशी भुजबळ यांची शिवसेना प्रवेशाबाबत चर्चा झाल्याचेही बोलले जात होते. या सर्व घडामोडीवर नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेच्या आमदार, नेत्या आणि कार्यकर्त्यांनी उद्धव यांची मुंबईत भेट घेऊन भुजबळांना प्रवेश देऊ नये अशी मागणी केली. 

त्यावर उद्धव यांनी या पदाधिकाऱ्यांना आश्‍वासन देताना सांगितले, भुजबळ यांना शिवसेनेत कदापी प्रवेश दिला जाणार नाही. उद्धव यांच्या आश्‍वासनामुळे भुजबळ यांना शिवसेनेचे दरवाजे कायमची बंद झाली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com