chagan bhujabal attack bjp government in jintur | Sarkarnama

ओबीसी महामंडळाला एक छदामही दिला नाही, भुजबळांचा भाजप सरकारवर घणाघात 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 23 जानेवारी 2019

जिंतूर  : "" गेली साडेचार वर्षात ओबीसी महामंडळाला एक छदाम दिला नाही,'' असा घणाघात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज येथे केला. 

राष्ट्रवादी कॉग्रेसच्यावतीने निर्धार परिवर्तनाचा या राज्यव्यापी परिवर्तन यात्रेचे आज जिंतूर शहरात आगमन झाले. त्यावेळी भुजबळ बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री ऍड. गणेशराव दुधगावकर, माजी खासदार सुरेश जाधव आदी उपस्थित होते. 

मोदी- फडणवीस सरकारवर हल्लाबोल करताना भुजबळ म्हणाले, "" मराठवाड्यासह राज्यात दुष्काळ पडला. भीषण दुष्काळाचे संकट आहे. तरीही जनावरांसाठी अद्याप चारा छावण्या सुरू केल्या नाहीत. गेल्या साडेचार वर्षात ओबीसी महामंडळाला सरकारने एक छदाम दिला नाही. राफेल घोटाळ्याचं सरकारकडे उत्तर नाही.'' 

मुंडे म्हणाले, "" सरकारमध्ये शेतकऱ्यांचे नेतृत्व करणारा नेताच नाही त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. शेतीमालाला भाव नाही, भाजप सरकारच्या काळात महाराष्ट्रात सोळा हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. मागील निवडणुकीत भाजपने अच्छे दिनचे स्वप्न दाखवून जनतेचा भ्रमनिरास केला.'' 

भेत जिंतूर सेलु तालुक्‍यातील भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी आमदार विजय भांबळे, आमदार प्रदीप नाईक, जिल्हा परिषद अध्यक्षा ऊज्वला राठोड, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर, सारंगधर महाराज आदी उपस्थित होते.ऍड. विनोद राठोड यांनी आभार मानले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख