CHAgan bhujabal attack bjp | Sarkarnama

छगन भुजबळांचा कोणी आवाज बंद करू शकत नाही : भुजबळ

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 15 डिसेंबर 2018

पंढरपूर : " कश्‍तीया यो उनकी डूबती है जिनके इमान डगमगाते है जिनके दिल मे नेकी है उनके सामने मंझीले भी हर झुकाती है ! असे सांगत माझा आवाज कोणी बंद करू शकत नाहीत अशी डरकाळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी फोडली. 

मागील काही महिन्यापासून राजकीय विजनवासात असलेले भुजबळ पुन्हा राजकारणात सक्रीय झाले आहेत. आज ते सांगोला येथे आले असता भाजप विरोधात बोलताना भीती वाटते का असा प्रश्न केला असता त्यानी शायराना अंदाजात आपण प्रामाणिक असल्याचे सांगितले 

भुजबळ डगमगणारा नाही. असला माणूस मी नाही. चढ उतार ठोकर खूप खाल्ल्यात. जो पर्यंत जीवंत आहे तो पर्यंत माझ तोंड कोणी बंद करू शकत नाही. दहा दहा केसेस टाकल्या तरी परत परत आत टाकले तरी माझी लढाई सुरूच असेल.जनता जो पर्यंत सोबत आहे सरकार मला काही करू शकत नाही असेही भुजबळ यावेळी म्हणाले. 

उध्दव ठाकरे यानी राम मंदिराचा मुद्दा घेतलाय यावर बोलताना भुजबळ म्हणाले उद्धव ठाकरे हे मॅच्युअर आहेत. असंगाशी संग केल्यावर काय होत हे त्याना माहीत आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख