central government black listed 960 tablighi jamaat members | Sarkarnama

तबलिगी जमातच्या `त्या' 960 जणांना केंद्राने टाकले काळ्या यादीत 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 3 एप्रिल 2020

दिल्लीत तबलिगी जमातच्या कार्यक्रमात आलेल्या 960 परदेशी नागरिकांचा व्हिसा केंद्र सरकारने रद्द केला आहे. तसेच या सर्वांना काळ्या यादीतही टाकण्यात आले आहे. हे सर्वजण पर्यटन व्हिसा घेऊन भारतात आले होते.

नवी दिल्ली ः- दिल्लीत तबलिगी जमातच्या कार्यक्रमात आलेल्या 960 परदेशी नागरिकांचा व्हिसा केंद्र सरकारने रद्द केला आहे. तसेच या सर्वांना काळ्या यादीतही टाकण्यात आले आहे. हे सर्वजण पर्यटन व्हिसा घेऊन भारतात आले होते. 

राष्ट्रीय आपत्ती प्रतिबंधक कायद्यान्वये गृहखात्याने ही कारवाई केली असून या कायद्याच्या उल्लंघनाबद्दल या सर्व 960 जणांविरुद्ध कायदेशीर कारवाईचे आदेशही दिल्ली पोलिसांसह सर्व राज्यांच्या पोलिस महासंचालकांना दिले आहेत. 

संपूर्ण देशात संचारबंदी सुरू असताना निजामुद्दीन परिसरात तबलिगी जमातच्या मर्कजमध्ये (मुख्यालयामध्ये )धार्मिक कार्यक्रमात उत्तर प्रदेश,पंजाब, उत्तराखंड, मध्यप्रदेश, कर्नाटक, बिहार, गुजरात, छत्तीसगड, महाराष्ट्रासह देशभरातून लोक आले होते. एवढेच नव्हे तर पाकिस्तान, बांगलादेश, इंडोनेशिया, श्रीलंका, अफगाणिस्तान, मलेशिया, इंग्लंड, चीन येथील नागरीकांचाही समावेश होता. सुरवातीला या मशिद वजा मुख्यालयात हजार जण असल्याचे सांगितले जात होते. प्रत्यक्षात त्यातून तब्बल 2361 जणांना बाहेर काढण्यात आले. 

वेगवेगळ्या राज्यांमधून दिल्लीत आलेले तबलिगी जमातचे कार्यकर्ते आपापल्या भागांमध्ये परतले असल्याने तेथेही कोरोना संक्रमणाची वाढती शक्यता पाहता या सर्वांना शोधण्यासाठी सरकारी यंत्रणांची धावपळ सुरू झाली आहे. केंद्रीय मंत्रीमंडळ सचिव राजीव गौबा यांनी काल सर्व राज्यांच्या मुख्यसचिव तसेच पोलिस महासंचालकांची व्हिडीओ काॅन्फरन्सिंगद्वारे बैठक घेऊन तबलिगी जमातच्या कार्यकर्त्यांना शोधण्यास सांगितले होते. तसेच परदेशी नागरिकांचा सहभागामुळे व्हिसाच्या नियम, अटींचे उल्लंघनाचीही चौकशी सरकारने सुरू केली होती. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख