center demond rejected whatsapp | Sarkarnama

केंद्र सरकारची मागणी "व्हॉट्‌सऍप'ने फेटाळली 

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

नवी दिल्लीः फेक मेसेजचा मूळ स्त्रोत जाणून घेण्यासाठी स्वतंत्र प्रणाली विकसित करण्यास 'व्हॉट्‌सऍप'ने आज स्पष्टपणे नकार दर्शविला. यूजर्सच्या गोपनीयता अधिकाराचा यामुळे भंग होईल, असे कारण 'व्हॉट्‌सऍप'ने पुढे केले आहे. 

नवी दिल्लीः फेक मेसेजचा मूळ स्त्रोत जाणून घेण्यासाठी स्वतंत्र प्रणाली विकसित करण्यास 'व्हॉट्‌सऍप'ने आज स्पष्टपणे नकार दर्शविला. यूजर्सच्या गोपनीयता अधिकाराचा यामुळे भंग होईल, असे कारण 'व्हॉट्‌सऍप'ने पुढे केले आहे. 

सोशल मीडियावर मेसेजद्वारे पसरलेल्या अफवांमुळे निष्पाप लोकांची जमावाकडून हत्या होण्याचे प्रकार समोर आल्यानंतर केंद्र सरकारने "व्हॉट्‌सऍप'ला यावर तांत्रिक समाधान शोधण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, सरकारच्या म्हणण्याप्रमाणे अशी कोणतीही प्रणाली विकसित करता येणार नसल्याचे "व्हॉट्‌सऍप'च्या प्रवक्‍त्याने आज स्पष्ट केले. असे केल्यास यूजर्सच्या गोपनीयता अधिकाराचे उल्लंघन होणार असून, उलट यामुळे गैरवापर वाढेल, अशी शक्‍यताही प्रवक्‍त्याने व्यक्त केली. 

संदेश कोणी पाठविला, याच्या मुळाशी जाऊन संबंधितावर कारवाई केली, तर अशा घटनांना लगाम बसेल, अशी सरकारची धारणा असून, "व्हॉट्‌सऍप'चे मुख्य कार्यकारी अधिकारी ख्रिस डॅनियल यांनी माहिती व तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांची नुकतीच दिल्ली येथे भेट घेतली होती. या भेटीत प्रसाद यांनी विविध सूचना केल्या होत्या. त्यात फेक मेसेजसाठी स्वतंत्र प्रणाली व तक्रार अधिकाऱ्याची नियुक्ती यांचा समावेश होता. 

जनजागृतीवर 'व्हॉट्‌सऍप'चा भर 
चुकीच्या माहितीविषयी यूजर्समध्ये जनजागृती करण्यावर "व्हॉट्‌सऍप'चा भर आहे. "व्हॉट्‌सऍप'च्या माध्यमातून अनेक जण संवेदनशील माहितीची देवाण-घेवाण करतात. त्यामुळे यूजर्सच्या गोपनीयतेबाबत कोणतीही तडजोड करता येणार नाही, असेही कंपनीच्या प्रवक्‍त्याने स्पष्ट केले.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख