`देवेंद्र फडणवीस यांच्या विठ्ठल भक्तीमुळेच आजचा हा योगायोग जुळून आला'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त आहेत. विठ्ठलावर त्यांची आजही नितांत श्रद्धा आहे. राज्यात पुन्हा भाजप-शिवसेनेला स्पष्ट बहुमत असतानाही ऐनवेळी शिवसेनेने मुख्यमंत्री पदावरून भाजपशी फारकत घेतली होती. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी कार्तिकी एकादशीच्या दिवशीच आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
`देवेंद्र फडणवीस यांच्या विठ्ठल भक्तीमुळेच आजचा हा योगायोग जुळून आला'

पंढरपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त आहेत. विठ्ठलावर त्यांची आजही नितांत श्रद्धा आहे. राज्यात पुन्हा भाजप-शिवसेनेला स्पष्ट बहुमत असतानाही ऐनवेळी शिवसेनेने मुख्यमंत्री पदावरून भाजपशी फारकत घेतली होती. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी कार्तिकी एकादशीच्या दिवशीच आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.

पंधरा दिवसांच्या नाट्यमय राजकीय घडामोडीनंतर आज आळंदी एकादशीच्या (भागवत) दिवशी आज पुन्हा देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आजचा हा योगायोग देवेंद्र फडणवीस यांच्या विठ्ठल भक्तीमुळेच जुळून आल्याची प्रतिक्रिया विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे यांनी आज व्यक्त केली.

मुख्यमंत्री म्हणून आज देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी पंढरपूर शहरात फटाक्याची  आतषबाजी करत जल्लोष साजरा केला. यावेळी शहराध्यक्ष संजय वाईकर, माजी शहर अध्यक्ष बाबा बडवे, अपर्णा तारके, सचिता सगर, कैलास कारंडे, शाम तापडीया, शंतुनू दंडवते, उमेश ढोबळे, नाना करकमकर आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com