celebration in indapur over three states result | Sarkarnama

तीन राज्यांच्या निकालाने इंदापुरात काॅंग्रेसचा आनंद गगनात मावेना

राजकुमार थोरात
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

वालचंदनगर : मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड येथील विधानसभा निवडणुकींमध्ये काॅंग्रेस पक्षाला बहुमत मिळाल्यामुळे इंदापूर तालुक्यातील कॉग्रेसप्रेमीचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल म्हणून  नुकत्याच झालेल्या या निवडणुकांकडे पाहिले जात होते.या निवडणूकीमध्ये कॉग्रेसने भाजपला धोबीपछाड केल्यानंतर इंदापूरकरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी हा दिलासा मानला जात आहे. 

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर राज्यात व देशामध्ये व इंदापूर तालुक्यामध्ये  कॉग्रेसला सुर सापडत नव्हता. राज्यात व देशात काॅग्रेस पक्षाचा भाजप पक्ष शत्रूपक्ष आहे. मात्र इंदापूर तालुक्यामध्ये  कॉग्रेसचे हर्षवर्धन पाटील यांचे राष्ट्रवादी कॉग्रेस आमदार दत्तात्रेय भरणे हे मुख्य विरोधक आहेत. भरणे यांनी विधानसभेच्या निवडणूकीनंतर कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदीविक्री संघ ताब्यात घेवून पाटील यांचे राजकीय कारर्किर्द संपविण्यास सुरवात केली होती. मात्र पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये पाटील यांनी गड  राखून  नव्याने पुन्हा तालुका काबीज करण्यास सुरवात केली आहे.

गेल्या सहा महिन्यांपासुन  इंदापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काॅग्रेस व कॉग्रेस पक्षामध्ये इंदापूरच्या जागेवरुन दावे-प्रतिदावे सुरु आहेत. इंदापूरच्या जागेचा वाद राज्याच्या राजकारणापर्यंत पोचला असल्याने इंदापूरच्या जागेला असाधारण महत्व आहे.  सध्या कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षामध्ये लोकसभा व विधानसभा निवडणूकीसाठी आघाडीची  बोलणी सुरु आहे. आगामी राजकीय गणिते पाहता इंदापूरची जागा कॉग्रेस पक्षाला मिळण्याच्या चर्चेला गेल्या आठ दिवसापासून उधाण आले आहे. यामध्ये तीन राज्याच्या निवडणूकीमध्ये कॉग्रेसला बहुमत मिळाल्यामुळे  कॉग्रेस पक्षाला अच्छे दिन येण्यास सुरवात झाली आहे.

यासंदर्भात हर्षवर्धन पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मोदी लाट ओसरली असून राहुल गांधीची लाट सुरु झाली आहे. २०१९ च्या लोकसभा व विधानसभा निवडणूकीमध्ये कॉग्रेसप्रणित आघाडी पक्षाचा निश्चित विजय होईल.
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख