आलो रे आलो, मी पुन्हा आलो.....भाजपच्या कार्यकर्त्यांचा गुलमंडीवर जयघोष

आलो रे आलो, मी पुन्हा आलो.....भाजपच्या कार्यकर्त्यांचा गुलमंडीवर जयघोष

औरंगाबाद : " देवेंद्र फडणवीस यांचे मी पुन्हा येईन,मी पुन्हा येईल' या वाक्‍याने निवडणुकीनंतर सोशल मिडियावर चांगले गाजले. या वाक्‍याच्या माध्यमातून भाजपची टर उडविण्यात आली. मात्र आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधीनंतर राज्यभरात भाजपतर्फे जल्लोष साजरा करण्यात आला. ज्या वाक्‍याने विरोधकांनी भाजपची खिल्ली उडवली त्या वाक्‍याने आता कार्यकर्ते जल्लोष करू लागले आहेत. औरंगाबादेत फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर "आलो रे आलो मी पुन्हा आलो' अशा घोषणा कार्यकर्त्यांनी देत भाजप सरकारचे स्वागत केले. 

औरंगाबादेतील गुलमंडी येथे शहर कार्यकारिणीतर्फे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी शपथ घेतल्यानंतर लाडू वाटून जल्लोष करण्यात आले. यानंतर देवेंद्र फडणवीस आणि भाजप सरकारचा जयघोष करण्यात आला. यात कार्यकर्त्यांनी " आलो रे आलो मी पुन्हा आला े' अशा जयघोषणा देत शहर परिस दणाणून सोडला. मी पुन्हा येईल, या वाक्‍यावरून भाजपच्या कार्यकर्त्यांना चिडविण्यात येत होते. त्यामुळे हे वाक्‍य आज सिद्ध झाल्याचे सांगत मोठ्या उत्साहाने कार्यकर्त्यांनी, आलो रे आलो मी पुन्हा आलोचा घोषणा देत आनंद व्यक्‍त केला. यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी, गजानन बारवाल, दिलीप थोरात, विकास कुलकर्णी, दयाराम बसैय्ये, मंगलमुर्ती शास्त्री, सचिन झव्हेरी उपस्थित होते.फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर गुलमंडीवर महिला मोर्चातर्फे वाहनधारक आणि व्यापाऱ्यांना लाडू वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला 

मी पुन्हा येईन. आलोच.... 
भाजप महिला मोर्चाच्यातर्फे गुलमंडीवर मोठ्या उत्साह दिसून आला. महिला मोर्चातर्फे फडणवीस यांच्या विजयानंतर फटाके फोडून व गुलाल उधळून जल्लोष साजरा करण्यात आला. यासह गुलमंडीवर "मी पुन्हा येईल'- मी आलोच, मी पुन्हा येईल - मी आलोच' असा जय घोष महिलांनी केला. यात महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष ऍड. माधूरी आदवंत इतर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. 

सिडकोतही जल्लोष 
मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर माजी राज्यमंत्री अतुल सावें यांच्या संपर्क कार्यालयासमोर भाजप पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून जल्लोष केला. यासह ढोल-ताशाच्या गजरात नृत्याही केले. सिडको एन-7 येथील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भाजपच्या राजाबाजार मित्रमंडळातर्फे फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com