संघर्ष यात्रा होताच शेतकऱ्यांवर खटले 

संघर्ष यात्रा होताच शेतकऱ्यांवर खटले 

यावेळी शेतकऱ्यांनी मोजणीला तीव्र विरोध केला होता. त्यावेळी दगडफेक करणाऱ्या जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला होता. त्यावेळी संबंधितांवर कोणताही गुन्हा दाखल न करता त्यांना सोडण्यात आलं होतं. त्यानंतर आता नोटीशींमुळे शेतकरी संतप्त झाले.

नाशिक: विरोधी पक्षांनी काढलेल्या संघर्ष यात्रेत शेतकऱ्यांच्या जमिनी एकतर्फी संपादनाच्या विरोधात तीव्र आंदोलनाची घोषणा झाली. मात्र संघर्ष यात्रा जिल्ह्याबाहेर रवाना होताच पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर दडपशाही सुरु केली आहे.

 शिवडे (ता. सिन्नर) येथे विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना पडताच चॅप्टर  केस दाखल करण्याच्या नोटीस देऊन आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. त्यामुळे आता शिवसेना काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

यासंदर्भात समृद्धी महामार्गासंदर्भात लढा उभारणाऱ्या शिवडे गावातील 42 शेतकऱ्यांना सरकारने चॅप्टर केस दाखल करण्याची नोटीस बजावलीय, ज्यामुळे जिल्ह्यात संतप्त प्रतिक्रिया उमटतायत. यामुळे शेतकरी आणि प्रशासन असा आणखी एक नवा लढा उभा राहीलाय.शिवडे गावात 7 एप्रिलला झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 42 शेतकऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलीय.

 यावेळी शेतकऱ्यांनी मोजणीला तीव्र विरोध केला होता. त्यावेळी दगडफेक करणाऱ्या जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला होता. त्यावेळी संबंधितांवर कोणताही गुन्हा दाखल न करता त्यांना सोडण्यात आलं होतं. त्यानंतर आता नोटीशींमुळे शेतकरी संतप्त झाले. शिवसेना सत्तेत आहे. तरीही त्यांचा भूसंपादनाला विरोध आहे. त्यामुळे खरोखर रस्त्यावर उतरता की केवळ राजकीय विरोध करता याविषयी शेतकऱ्यांत चर्चा आहे. 

शेतकऱ्यांनी या नोटीस स्वीकारल्या नाहीत. त्यामुळे या नोटीसा शिवडे ग्रामपंचायतीच्या फलकावर लावण्यात आल्यात. संदर्भात संघर्ष समिती आता न्यायालयात जाणार आहे. जिल्हा आणि पोलीस प्रशासन बळाचा वापर करून गुन्हे दाखल करतंय, शेतकऱ्यांना धमकावतंय असा आरोप संघर्ष समितीने केलाय.सरकार आपल्या निर्णयावर ठाम राहिलं तर शेतकरी नक्षली मार्गाने आपला लढा पुढे घेवून जातील असे ऍड जयदीप, ऍड सुभाष हारक यांनी सांगीतले. 
... 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com