carporators lobbying for standing committe | Sarkarnama

स्थायी समितीसाठी नगरसेवकांची मोर्चेबांधणी

सरकारनामा ब्युराे
शनिवार, 11 मार्च 2017

स्थायी समितीमध्ये भाजपच्या वाट्याला सर्वाधिक दहा सदस्य येण्याची शक्यता  आहे. त्यापाठोपाठ काँग्रेसचे तीन, शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आणि अपक्ष, एमआयएम आणि भारिप-बमसं मिळून एक सदस्य समितीवर निवडल्या जाण्याची शक्यता आहे. 

अकोला: महापालिकेत एकहाती सत्ता मिळविलेल्या भाजपसह विराेधी पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना अाणि भारिपबमसं, एमअायएममध्ये आता स्थायी समितीमध्ये वर्णी लागावी यासाठी रस्सीखेच सुरू झाली अाहे. साेळा सदस्यांच्या या समितीतील सदस्यांची निवड महापालिकेत्या पहिल्या सर्वसाधारण सभेत हाेणार अाहे.

 त्यासाठी सत्ताधारी अाणि विराेधी पक्षातील काही जेष्ठ व तरुण नगरसेवकांनी अापल्या ‘गॉड फादर’ फिल्डिंग लावणे सुरू केले अाहे. ‘साेन्याची अंडी देणारी काेेंबडी’ म्हणुन अाेळखल्या जाणाऱ्या स्थायी समितीत सर्वाधिक भाजपचे दहा सदस्यांची वर्णी लागणार असल्याने पक्षातंर्गत चढाअाेढ वाढली अाहे. 

अकाेला महापालिकेच्या रणसंग्रामात भाजपने सर्वांधीक अठ्ठेचाळीस जागांवर विजय मिळवित सत्ता काबीज केली अाहे. महापाैर व उपमहापाैर पदाच्या निवडणुकीत काँग्रेसला चारीमुड्या चित करत महापाैर आणि उपमहापाैरपदवर अनुक्रमे विजय अग्रवाल आणि वैशाली शेळके विजयी झाले. नवनिर्वाचीत महापाैर, उपमहापाैरांनी पदग्रहण केल्यानंतर आता भाजपमधील जुन्या, नव्या नगरसेवकांनी स्थायी समितीमध्ये वर्णी लागावी, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. महापालिकेच्या या निवडणुकीत भाजपच्या सर्वांधिक तरूण नगरसेवकांची संख्या जास्त अाहे. त्यातील बहुतांश नगरसेवक खासदार संजय धाेत्रे, अामदार गाेवर्धन शर्मा, अामदार रणधीर सावरकर गटातील असल्याने अनेकांनी स्थायी समिती सभापती पदावर वर्णी लागावी यासाठी अाग्रह सुरू आहे. 

  
दुसरीकडे सदस्य म्हणून समितीमध्ये स्थान मिळावे म्हणून ज्येष्ठ नगरसेवक आणि नगरसेविकांसह प्रथमच नगरसेवक झालेल्यांनीही नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. मात्र, महापाैर, उपमहापाैरांच्या पदग्रहण सोहळ्यात खासदार संजय धोत्रे, आमदार गोवर्धन शर्मा आणि आमदार रणधीर सावरकर यांनी भाषणातून काही नगरसेवकांच्या निवडणूक काळातील वागणुकीबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे या नगरसेवकांना स्थायी समितीमध्ये सदस्य म्हणूनही जागा मिळण्याची शक्यता कमीच आहे. यात काही ज्येष्ठ नगरसेवकांचे पत्ते कट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. साेळा सदस्य संख्या असलेल्या स्थायी समितीमध्ये भाजपच्या वाट्याला सर्वाधिक दहा सदस्य येण्याची शक्यता  आहे. त्यापाठोपाठ काँग्रेसचे तीन, शिवसेनेचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आणि अपक्ष, एमआयएम आणि भारिप-बमसं मिळून एक सदस्य समितीवर निवडल्या जाण्याची शक्यता आहे. सत्ताधाऱ्याप्रमाणेच विराेधी पक्षातही स्थायी समितीमध्ये वर्णी लागावी, यासाठी जाेरदार माेर्चेबांधणी करण्यात येत असल्याने महापालिकेचे राजकारण तापले अाहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख