Candidates Wives active in Campaigning at Nashik | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

नाशिकच्या प्रचारात उमेदवारांपेक्षा महिला आणि अर्धांगीनींची आघाडी

संपत देवगिरे
मंगळवार, 16 एप्रिल 2019

लोकसभा निवडणुकीचे मतदान दोन आठवड्यांवर आहे. त्यामुळे सध्या प्रचारात रंगत येऊ लागली आहे. अगदी पहाटेपासूनच उमेदवारांचा प्रचार सुरु होतो. मात्र, उमेदवारांएव्हढ्याच त्यांच्या अर्धांगिनीही सक्रीय झाल्या आहेत. पत्रके वाटणे, गाठीभेटीत सक्रीय झाल्या आहेत.  अर्धांगीनींच्या सहभागाने मतदारसंघातील प्रचाराला सभ्यता, शालीनता देखील आली आहे.

नाशिक : लोकसभा निवडणुकीचे मतदान दोन आठवड्यांवर आहे. त्यामुळे सध्या प्रचारात रंगत येऊ लागली आहे. अगदी पहाटेपासूनच उमेदवारांचा प्रचार सुरु होतो. मात्र, उमेदवारांएव्हढ्याच त्यांच्या अर्धांगिनीही सक्रीय झाल्या आहेत. पत्रके वाटणे, गाठीभेटीत सक्रीय झाल्या आहेत.  अर्धांगीनींच्या सहभागाने मतदारसंघातील प्रचाराला सभ्यता, शालीनता देखील आली आहे.

लोकसभा निवडणुकीत शहरासह लगतच्या सिन्नर, इगतपुरी भागात मोठ्या प्रमाणात प्रचार सुरु आहे. त्यामुळे उमेदवारांना अगदी पहाटेपासूनच बाहेर पडावे लागते. आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे समीर भुजबळ यांनी पहाटे सहालाच गोल्फ क्‍लब, कृषीनगर जॉगींग ट्रॅक गाठले होते. जॉगींगच्या पोशाखासह त्यांच्या समवेत श्रीमती शेफाली भुजबळ देखील होत्या. हे दोघेही नियमीत जॉगींग करीत असल्याने त्यांनी चालणाऱ्या नागीरकांशी संवाद साधत गाठीभेटी घेतल्या. यावेळी मैदानात सुरु असलेल्या क्रिकेटच्या खेळाडूंना शुभेच्छा देतांना त्यांनी काही वेळ बॅट हाती घेत बॅटींगही केली. या सर्व उपक्रमांत श्रीमती शेफाली भुजबळ तेव्हढ्याच उत्साहाने महिला, ज्येष्ठ नागरीकांशी संवाद करीत होत्या. मतदारांच्या अडीअडचणी जाणून घेत होत्या. स्वतः श्रीमीत शेफाली या एमईटी शिक्षण संस्थेच्या संचालक असल्याने विविध सामाजिक, सार्वजनिक उपक्रमांत सहभागी होत असतात. यंदा त्या प्रचारात मोठ्या प्रामणात सक्रीय आहेत.

सिन्नर तालुक्‍यात शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रचारात त्यांच्या पत्नी अनिता, सिन्नरचे आमदार राजाभाऊ वाजे यांच्या पत्नी दिप्तीताई यांसह त्यांच्या कुटुंबातील महिला सदस्यांचा मोठा सहभाग असतो. सिन्नर शहर तसेच पिरसरात गेले दहा दिवसांपासून प्रचारात आहे. घोरघरी जातांनाच परिचीत व नातेवाईकांच्या गाठीभेटींवर त्यांचा भर आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्‍यात घोटी या मध्यवर्ती ठिकानाहुन तालुक्‍यातील प्रचाराची दिशा ठरवली जाते. नाशिक मतदारसंघाला कनेक्‍टेड या तालुक्‍यात उमेदवारांच्या सौभाग्यवतींनीही तालुका पिंजून काढला आहे.

युतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या पत्नी सौ. अनिता गोडसे, आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या पत्नी सौ. शेफाली भुजबळ, अपक्ष उमेदवार माणिकराव कोकाटे यांच्या पत्नी सौ. सीमाताई कोकाटे तसेच त्यांच्या कन्या जिल्हा परिषद सदस्या सीमांतीनी कोकाटे यांनी स्वतंत्रपणे तालुक्‍यातील सर्वाच गटात फिरून मतदान करण्याबाबत मतदारांना आवाहन केले. विविध देवळांतुन बैठकाही घेतल्या आहेत. आज शिवसेना भाजपा युतीनेही तालुक्‍यातील प्रत्येक गटात शिवसेना, भाजपा युतीच्या सर्वच नेते व कार्यकर्त्यांनी संयुक्तपणे प्रचार दौरा करून गावागावात मतदारांच्या भेटी घेऊन उमेदवार व युतीच्या सरकारने केलेल्या कामांचा लेखजोखा जनतेपुढे सादर केला. जवळपास आगामी पाच दिवस तालुक्‍यातील सर्वच गटात हे पदाधिकारी प्रचार करणार आहे.

सोशल मिडीया, डिजीटल प्रचार, आधुनिक वाहने, प्रचार कार्यालये, प्रचाराचे मायक्रो प्लॅनिंग यामुळे सध्याच्या प्रचाराचे स्वरुप बदलले आहेत. त्यामुळे उमेदवारांच्या कुटुबांतील महिलांना कार्यकर्त्यांच्या स्वागत, भोजन अन्‌ व्यवस्थेचे मर्यादीत काम केव्हाच कालबाह्य झाले आहे. त्यामुळे सध्या तर कार्यकर्ते मागे अन्‌ उमेदवार, नेत्यांच्या अर्धागीनीच कोपरा सभा, बैठकांत प्रचाराला दिशा देण्याचे काम करतांना दिसतात. त्यामुळे वातावरण, प्रचार, मुद्दे यामध्ये शालीनता वाढली आहे. हे यंदाच्या निवडणुकी वैशीष्ठ्य ठरावे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख