Candidates are desperate for Ambedkar, Oaisi And Raj Thakare's public meeting | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

चवथ्या फेरीत आदित्य ठाकरे 19954 मतांनी आघाडीवर....
दौंड (पुणे) मध्ये आमदार राहुल कुल ६३३९ मतांनी आघाडीवर
दहाव्या फेरीअखेर धनंजय मुंडे 13 हजार मतांनी आघाडीवर
साताऱ्यातून उदयनराजे 32 हजार मतांनी पिछाडीवर
रोहित पवार आठव्या फेरीअखेर 12170 मतांनी आघाडीवर
येवला मतदारसंघ- छगन भुजबळ ३४७२ मतांनी आघाडी
मालेगाव बाह्य - शिवसेनेचे दादा भुसे 21 हजार 913 मतांनी आघाडीवर.
कुलाबा मतदार संघात भाजप चे राहुल नार्वेकर 7 हजार मतांनी आघाडीवर
चिंचवड - भाजपचे लक्ष्मण जगताप 7785 मताने आघाडीवर.
तिसऱ्या फेरीत शिवसेनेचे आदित्य ठाकरे 16 हजार मतांनी आघाडीवर
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघ उदयनराजे भोसले दुसऱ्या फेरीत 10500 हजार मतांनी पिछाडीवर
सावंतवाडी शिवसेनेनेचे दीपक केसरकर दुसऱ्या फेरीत 703 मतांनी आघाडीवर
कराड दक्षिण मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण 1200 मतांनी आघाडीवर
सातारा : सातारा विधानसभा भाजपचे शिवेंद्रराजे भोसले आघाडीवर
भोकर मतदारसंघात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आघाडीवर
भुसावळला पहिल्या फेरीत भाजपचे आमदार संजय सावकारे यांना 3960 मतांची आघाडी.
इंदापूर हर्षवर्धन पाटील 1000 मतांनी आघाडीवर
राज्यात मतमोजणीला सुरुवात

आंबेडकर , राज ठाकरे, ओवैसी यांच्या सभांसाठी उमेदवारांची धडपड

तात्या लांडगे 
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

..

सोलापूर : विधानसभा निवडणुकीत आपल्या नेत्यांच्या सभेला गर्दी व्हावी अन्‌ त्याचा फायदा आपल्याला व्हावा या उद्देशाने उमेदवारांचा आटापिटा सुरु असल्याचे चित्र आहे. 

वंचित बहूजन आघाडीच्या सोलापुरातील उमेदवारांनी ऍड. प्रकाश आंबेडकर यांना तर रिपाइंच्या उमेदवारांनी पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले,  मनसेने राज ठाकरे आणि एमआयएमने पुन्हा एकदा खासदार असदुद्दीन ओवैसी यांना निमंत्रण धाडले आहे.  

 

Image result for raj thackeray facebook

मात्र, राज्यभरातील उमेदवारांसाठी सभा घेणाच्या व्यस्त कार्यक्रमामुळे या नेत्यांचे दौरे अद्यापही अनिश्‍चितच असून तारीख अंतिम करण्यासाठी उमेदवारांची धडपड सुरु असल्याचे दिसून येते.

भाजप- शिवसेना महायुतीत रिपाइंला सोलापुरातील माळशिरससह सहा जागा मिळाल्या आहेत. तर वंचित बहूजन आघाडी, मनसे, एमआयएमचेही राज्यभरात शंभरहून अधिक उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात आहेत.  त्यांनी होम- टू- होम प्रचाराला सुरवात केली आहे .

मात्र, शिवसेना, भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा,  शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अन्य नेतेमंडळींचे दौरेनिश्‍चित झाले आहेत. 

तर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांसाठी शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार अमोल कोल्हे, धनंजय मुंडे हे राज्यभर प्रचारसभा घेत आहेत. त्यामुळे आपल्याही प्रचारासाठी आपल्या पक्षाचा मोठा नेता यावा अन्‌ त्याचा आपल्याला फायदा व्हावा या उद्देशाने उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. अनेक उमेदवारांनी पक्षाच्या नेत्यांना निमंत्रण पत्रिकाही धाडली आहे. मात्र, व्यस्त कार्यक्रमांमुळे त्यांच्या तारखा निश्‍चित झाल्या नाहीत.

उमेदवारांचा होम- टू- होम प्रचारांवर भर

कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, भाजप उमेदवारांनी आपापल्या पक्षातील बड्या नेत्यांच्या सभा घेतल्या तर काहींच्या सभांचे नियोजनही ठरले आहे. तर मनसे, रिपाइं, एमआयएम पक्षाचे नेते प्रचारासाठी येणार आहेत .  मात्र, नेत्यांना निमंत्रण धाडूनही त्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे त्यांचे दौरे निश्‍चित झालेले नाहीत. त्यामुळे उमेदवारांनी होम- टू- होम प्रचाराला सुरवात केली असून कॉर्नर बैठकांसाठीही जोर लावल्याचे चित्र आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख