जिल्हा बॅंकेची निवडणूक तूर्त रद्द करा; आमदार अनिल पाटील यांचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र

जिल्हा बॅंकेची निवडणूक तूर्त स्थगित किंवा रद्द करून पुढे ढकलावी, अशी मागणी अमळनेरचे (जि. जळगाव) आमदार, जिल्हा बॅंकेचे संचालक अनिल पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे
MLA Anil Patil Writes to Ajit Pawar about Calcellation of Jalgaon District Bank Election
MLA Anil Patil Writes to Ajit Pawar about Calcellation of Jalgaon District Bank Election

चोपडा, जि. जळगाव : जिल्हा बॅंकेची निवडणूक तूर्त स्थगित किंवा रद्द करून पुढे ढकलावी, अशी मागणी अमळनेरचे (जि. जळगाव) आमदार, जिल्हा बॅंकेचे संचालक अनिल पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

जिल्ह्यातील विविध कार्यकारी संस्थांकडून ठराव मागविण्यात येत आहेत. अनेक ठिकाणी घोडेबाजार होत असल्याने सभासदांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील केवळ दहा सोसायट्यांमधून संचालक मंडळातून एका संचालकांचा ठराव होणार आहे. उर्वरित सोसायट्यांमध्ये नियमित कर्जफेड करणारा सभासदाचा ठराव होणार आहे. संचालक मंडळातून ठराव होत नसल्याने घोडेबाजार होत आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली आहे, असे पाटील यांनी सांगितले.

पाटील म्हणाले, ''जळगाव जिल्हा बॅंकेची निवडणूक पुढे ढकलली गेली तर बरे होईल. कर्जमाफी प्रक्रिया लवकर पूर्ण झाल्यास सोसायट्यांची तत्काळ वसुली होईल. ही वसुली जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अडचणी आहेत. अनेक सोसायटी किंवा सभासदांनी केलेले ठराव येणाऱ्या काळात रद्द होण्याची शक्‍यता आहे.''

'कर्जमाफी लवकर करावी'

जल्ह्यातील बऱ्याच विविध कार्यकारी संस्था थकीत कर्जामुळे 'क' व 'ड' वर्गात गेल्या आहेत. कर्जमाफीची प्रक्रिया सुरू असल्याने ती पूर्ण झाल्यानंतर बहुतेक संस्था ह्या 'अ' व 'ब' वर्गामध्ये येतील. त्यामुळे त्या बॅंकेच्या मतदानास पात्र होतील. याबाबत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेऊन कर्जमाफी लवकर व्हावी, त्यातील त्रुटी दूर कराव्या, कर्जमाफीतून अनेक शेतकरी वगळले आहेत. त्यांनाही समाविष्ट करावे, या संदर्भात संबंधीत मंत्र्यांची लवकरच भेट घेणार आहे, असेही पाटील यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com