वर्षा गायकवाड म्हणतात मी तर तापाने आजारी....म्हणून मुलाखतीला गेले नाही....

वर्षा गायकवाड म्हणतात मी तर तापाने आजारी....म्हणून मुलाखतीला गेले नाही....

धारावी : धारावी विधानसभा मतदारसंघातील कॉंंग्रेसच्या आमदार व माजी मंत्री वर्षा गायकवाड या भाजप किंवा शिवसेनेत पुढील काही दिवसात प्रवेश करत असल्याची बातमी धारावीतील राजकीय वर्तुळात गेली दोन दिवसांपासून फिरत आहे. त्यात गायकवाड या कॉंग्रेसच्या उमेद्वारीकारिता आयोजित केलेल्या मुलाखतीस न गेल्याने धारावीत या चर्चेला फोडणी मिळत होती.

काहीजण तर चार दिवसांत गायकवाड या कॉंग्रेस सोडून सत्ताधाऱ्यांच्या गोटात सामील होणारच अशी भाकीत वर्तवित आहेत. गेली काही दिवसांपासून कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते भाजप व शिवसेनेत प्रवेश घेत असल्याने गायकवाड युतीसोबत जाणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नुकतेच त्यांचे वडील माजी खासदार एकनाथ गायकवाड यांना मुंबई कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष म्हणून नेमले आहे. यासंदर्भात धारावीतील स्थानिक नेते व कार्यकर्ते संभ्रमात आहेत. जर आमदार गायकवाड यांनी पक्ष बदल केल्यास कॉंग्रेसची हक्काची जागा पक्षाला गमवावी लागेल. 2014 मध्ये मोदी लाट असतानाही वर्षा गायकवाड यांनी धारावी विधानसभा क्षेत्रात बाजी मारून आपले आमदारपद राखले होते. आघाडी सरकारमध्ये वर्षा गायकवाड या मंत्री सुद्धा होत्या. 

सध्याच्या वातावरणात काहीही घडू शकत अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. यासंदर्भात खुद्द आमदार वर्षा गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मी तापाने खूप आजारी आहे. त्यामुळे घराबाहेर पडत नाही. पक्ष बदलाबद्दल त्यांनी माझ्या रक्तात कॉंग्रेस आहे. माझ्या घराची कॉंग्रेसची परंपरा आहे. मी मरेपर्यंत कॉंग्रेसमध्येच राहणार आहे. माझ्याबद्दल ज्या बातम्या पसरवल्या जात आहेत त्यात तथ्य नसल्याचे स्पष्ट केले. मी भाजपा किंवा सेनेत जाणार नाही, असे निक्षून सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com