अब्दुल सत्तार यांच्या साम्राज्याला पालोदकर सुरुंग लावणार का ? 

वाढीव मतांचा पाऊस सत्तार सेठ यांच्यावर पडतो की प्रभाकर नानांवर हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.
abdul-sattar-palodkar
abdul-sattar-palodkar

औरंगाबादः जिल्ह्यातील सिल्लोड-सोयंगाव विधानसभा मतदारसंघाकडे संपुर्ण राज्याचे लक्ष वेधले गेले आहे. सलग दानेवेळा कॉंग्रेसच्या तिकीटीवर निवडून  आलेले माजी आमदार अब्दुल सत्तार यावेळी शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत, तर त्यांच्या विरोधात कॉंग्रेसचे प्रभाकर उर्फ नानासाहेब पालोदकर हे अपक्ष म्हणून मैदानात होते. 

सत्तार विरोधकांची मोट बांधत परिवर्तन घडवण्यासाठी पालोदकरांनी आपली पुर्ण शक्तीपणाला लावली. तालुक्‍यात 73 टक्के एवढे भरगोस मतदान देखील झाले. आता या वाढीव मतांचा पाऊस सत्तार सेठ यांच्यावर पडतो की प्रभाकर नानांवर हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.

अब्दुल सत्तार यांची सत्ता उलथवून टाकण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस अशा तिन्ही पक्षातील विरोधकांनी एकजूट करत ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. 'अभी नही तो कभी नही' चा नारा देत औरंगाबाद लोकसभे प्रमाणेच मराठा फॅक्‍टरचे ट्रॅक्‍टर सिल्लोडमध्ये धावणार अशी स्थिती मतदारसंघात निर्माण करण्यात पालोदकर आणि त्यांच्या समर्थकांना बऱ्यापैकी यश आल्याचे दिसते. तालुक्‍यात मतदानाचा टक्का वाढल्यामुळे हे वाढलेले मतदान नानांच्या पारड्यात पडल्याचा दावा केला जातोय.

तर दुसरीकडे ऐनवेळी बाजी पलटवण्यात माहीर असलेल्या अब्दुल सत्तार यांनी शेवटच्या दिवशी आपले सगळे पत्ते उघड करत वातावरण आपल्या बाजूने फिरवल्याची चर्चा आहे. विरोधकांच्या एकीला सुरुंग लावण्यात सत्तार यशस्वी झाल्यामुळे दुपारपर्यंत सुरू असलेली ट्रॅक्‍टरची हवा त्यानंतर शिवसेनेच्या धनुष्यबाणाने रोखल्याचे बोलले जाते. वंचित बहुजन आघाडी, कॉंग्रेसचे उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत प्रभाकर पालोदकर आणि अब्दुल सत्तार यांच्यातच झाली.

नगरपालिका ताब्यात असल्याने सिल्लोड शहरात सत्तार यांनी आघाडी घेतल्याचे चित्र आहे, तर ग्रामीण भागात मात्र त्यांना ट्रॅक्‍टरचा बऱ्यापैकी सामना करावा लागला आहे. पालोदकर यांना तालुक्‍यातील बहुसंख्य मराठा समाजाचा पाठिंबा मिळाल्याचे सांगितले जात असले तरी तालुक्‍यात शिवसेनेला मानणारा आणि सत्तार यांच्यामुळे नव्याने जोडला गेलेला मतदार सत्तारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल्याचे समजते. याशिवाय दलित, मुस्लिम आणि ओबीसी मते आपल्याकडे वळवण्यात सत्तार यांना चांगले यश मिळाल्यामुळे त्यांचा विजय निश्‍चित असल्याचा दावा केला जातोय.

सत्तारांना मित्राची साथ नाही?

सिल्लोड-सोयगांव मतदारसंघातील सत्तारांच्या विजयात आतापर्यंतच्या निवडणुकीत जालन्याचे भाजप खासदार रावसाहबे दानवे यांचा मोलाचा वाटा असायचा. यावेळी मात्र सत्तार यांना आपल्या या मित्राची साथ म्हणावी तशी मिळाली नाही. सत्तार यांच्या शिवसेना प्रवेशामुळे नाराज झालेल्या तालुक्‍यातील अडीचशेवर पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्यापासून दानवे यांनी सिल्लोडला जाणे टाळले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा सोडली तर संपुर्ण विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार असून देखील दानवे सत्तार यांच्या प्रचारासाठी तालुक्‍यात फिरकले नाहीत. भाजप पदाधिकाऱ्यांचा रोष नको म्हणून त्यांनी प्रचाराला येण्याचे टाळल्याचे बोलले जाते. दानवे यांचा यावेळी तालुक्‍यात हस्तक्षेप नसल्यामुळेच प्रभाकर पालोदकर सत्तार यांना चांगली लढत देऊ शकले अशी चर्चा आहे.

तालुक्‍यात दोन-तीन दिवस धो-धो पाऊस बरसल्यानंतरही मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. आता हा उत्साह सत्तार यांच्या बाजुने होता? की प्रभाकर पालोदर यांच्या रुपाने तालुक्‍यात परिवर्तनासाठी होता हे चोवीस तारखेच्या मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com