कणकवलीत नितेश राणे जिंकतील? : हवा वेगळेच सांगतेय....

सिंधुदर्गात नारायण राणेंच्या साम्राज्याला धक्का बसण्याची चिन्हे!
कणकवलीत नितेश राणे जिंकतील? : हवा वेगळेच सांगतेय....

सिंधुदुर्ग : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कणकवली विधानसभा मतदारसंघांमध्ये आश्चर्यकारक निकाल लागल्यास धक्का बसायला नको, असे सध्या वातावरण आहे.

कणकवली मतदारसंघ पारंपारिक  भाजपकडे असलेला मतदारसंघ आहे. मात्र राज्यात युती असताना शिवसेनेने सतीश सावंत यांना उमेदवारी दिली.  नारायण राणे आणि शिवसेनेचे असलेली कटुता पाहता शिवसेनेने ही भूमिका घेतलेली पाहायला मिळते. त्यामुळे येत्या काळात नारायण राणे यांना कोकणातील जनता स्वीकारणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. 

सतीश सावंत गोरगरिबांचे कैवारी असल्याचं म्हटलं जात आहे. तर दुसरीकडे नितेश राणे हे दहशतवादी या भूमिकेत पाहिलं जाते. त्यामुळे येत्या 24 तारखेला जनता नितेश राणे यांना स्वीकारते की सतिश सावतांना स्वीकारते हे पहावे लागणार आहे. शिवसेनेने या ठिकाणी आक्रमक भूमिका घेत सावंतांसाठी जिवाचे रान केले आहे. त्यामुळे येथील हवा वेगळेच म्हणजे राणेंच्या विरोधात आहे की काय, असे वातावरण आहे.

कुडाळ- मालवण ची परिस्थिती जर पाहिले 2014 मध्ये वैभव नाईक यांनी नारायण राणे यांचा पराभव केला. त्यानंतर आताच्या 2019 च्या निवडणुकीमध्ये नारायण राणे यांचे समर्थक रणजित देसाई हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. कोकणात दहशतवाद हा जर थांबायचं जर असेल तर वैभव नाईक यांना निवडून देणे फार गरजेचे आहे, असा नाईक समर्थकांचा दावा आहे. उमेदवार रणजित देसाई जरी असले तरी नारायण राणे हेच निवडणुकीमध्ये असल्याचं पाहिलं जातंय. त्यामुळे कुडाळ मालवण मधली जनता राणे यांना पुन्हा स्वीकारायला तयार नाही. त्यामुळे येत्या 24 तारखेला वैभव नाईक यांना जास्त संधी आहे.

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप बंडखोर राजन तेली विरुद्ध शिवसेना उमेदवार दीपक केसरकर हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. राजन तेली यांना नारायण राणे आणि पाठिंबा दिला आहे. येथेही केसरकर विरुद्ध राणे असाच सामना आहे.राजन तेली यांनी 2014 मध्ये सुद्धा या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवली होती. तेव्हा त्यांना केसरकर यांनी पराभूत केले होते. येथेही केसरकर यांचे पारडे जड आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com