'नॉट रिचेबल' मनसे नागरिकांच्या उपयोगी कशी पडणार? कल्याण ग्रामीण मतदारसंघात चर्चा...

विधानसभा निवडणुक लढविण्याचा निर्णय घेत मनसेने कल्याण ग्रामीण येथे राजू पाटील यांना उमेदवारी दिली खरी. परंतू 2014 च्या विधानसभेतील दारुण पराभवानंतर नॉट रिचेबल झालेली मनसे नागरिकांच्या उपयोगी कशी पडणार अशी चर्चा कल्याण ग्रामीण मतदार संघात रंगू लागली आहे. सेनेचे उमेदवार आणि मनसेचे उमेदवार दोन्हीही भूमिपूत्र असले तरी दोघांच्या कामांची तुलना मतदार करु लागले असून कोणत्या उमेदवारास मतदान करायचे याच्या चर्चा ग्रामीण भागात रंगू लागल्या आहेत.
Ramesh Mhatre - Raju Patil
Ramesh Mhatre - Raju Patil

ठाणे - विधानसभा निवडणुक लढविण्याचा निर्णय घेत मनसेने कल्याण ग्रामीण येथे राजू पाटील यांना उमेदवारी दिली खरी. परंतू 2014 च्या विधानसभेतील दारुण पराभवानंतर नॉट रिचेबल झालेली मनसे नागरिकांच्या उपयोगी कशी पडणार अशी चर्चा कल्याण ग्रामीण मतदार संघात रंगू लागली आहे. सेनेचे उमेदवार आणि मनसेचे उमेदवार दोन्हीही भूमिपूत्र असले तरी दोघांच्या कामांची तुलना मतदार करु लागले असून कोणत्या उमेदवारास मतदान करायचे याच्या चर्चा ग्रामीण भागात रंगू लागल्या आहेत.

अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे विभाजन झाल्यावर कल्याण ग्रामीण मतदारसंघ नव्याने निर्माण झाला. ग्रामीण भागात आगरी समाजाचे वर्चस्व जास्त असल्याने 2009 साली रमेश रतन पाटील यांनी सेनेचा पराभव करीत विजय मिळविला. परंतू त्यांनी आपला जनसंपर्क व कामे नीट न केल्याने 2014 ला त्यांना शिवसेनेकडून दारुण पराभव स्विकारावा लागला. यानंतर मात्र मनसे जणू काही ग्रामीण मधून हद्दपार झाल्याचेच चित्र पहावयास मिळत असल्याची चर्चा आहे. रमेश पाटील यांनी वारंवार पक्षांतर केल्याने पाटील बंधूंबद्दल मतदारांमध्ये अविश्वास निर्माण झाला आहे. यादरम्यान सेनेने या भागात आपले संघटन मजबूत केले. रमेश म्हात्रे हे डोंबिवलीत रहावयास असले तरी त्यांनी कामाच्या जोरावर ग्रामीण भागात आपले स्थान निर्माण केले आहे. लोकांना अडीअडचणीत उपयोगी पडणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे.

यंदाच्या पावसाळ्यात ग्रामीण भागात दोनदा पूरस्थिती निर्माण झाली होती. तेव्हाही म्हात्रे यांनी कोणतीही पर्वा न करता ग्रामस्थांना सर्व प्रकारची मदत देऊ केली. तसेच म्हात्रे यांनी महापालिकेत स्थायी समिती सभापती पद भूषविले होते त्याकाळात 27 गावांसाठी 191 कोटी रुपयांची पाणी पुरवठ्याची अमृत योजना मंजुर करुन घेतली होती. त्यांच्या या कार्यानेच त्यांना यंदा उमेदवारी मिळाली असल्याची चर्चा मतदार संघात आहे. या कामाच्या जोरावरच म्हात्रे निवडून येतील असे अनेकांचे मत आहे.

2019 ला मनसेने रमेश पाटील यांचे बंधू राजू पाटील यांना उमेदवारी दिली आहे. परंतू पक्षाचे कोणतेही ठोस असे कार्य नसल्याने राजू पाटील यांनी थेट जनतेच्या भावनेला हात घालीत वडिलांच्या पुण्याईवर मतदारांना आवाहन केले आहे. यामुळे आता वडिलांच्याच कार्यावर मुले किती दिवस मत मागणार, त्यांचे स्वतःचे व पक्षाचे काम काय असा सवाल केला जात आहे. हा सवाल बदलण्यासाठी जणू मनसे पक्षाच्या उमेदवारांच्या वतीने बदल हवा...आता चेहरा नवा ! असा प्रचार करीत असली तरीही नागरिकांमध्ये हा चेहरा दिसणार कधी अशी उपरोधिक चर्चा आता होऊ लागली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com