महापौर निवडणुकीतील पराभवाचा वचपा  भाजपा काढणार   ? 

विशेष म्हणजे गेल्या 5 वर्षापासून परिवहन सेवाच ठप्प असतानाही उल्हासनगरात मात्र समिती आहे. त्यांना मानधन दिले जाते.
Ulhasnagar-transport.
Ulhasnagar-transport.

उल्हासनगर  :   शनिवारी उल्हासनगर पालिका परिवहन सेवा सभापती पदाची निवडणूक होत आहे.या पदासाठी भाजपा आणि टीओके (टीम ओमी कालानी) यांच्यात आमना-सामना आहे. 


मागच्या महिन्यात शिवसेना, टीओके,राष्ट्रवादी,रिपाइ,कॉंग्रेस,पीआरपी हे एकवटल्याने भाजपा-साई पक्षावर नामुश्की ओढावली होती.

भाजपाकडे 6 आणि टीओके,शिवसेना,रिपाइ यांचे ही 6 सदस्य असून निर्णायक असणारे स्थायी समिती सभापतीचे मत हे भाजपाच्या पारडयात पडणार आहे.

त्यामुळे परिवहन सभापतीच्या निवडणुकीत भाजपाचे पारडे जड दिसत असल्याने महापौर-उपमहापौर निवडणुकीतील पराभवाचा बदला घेण्याची किंबहुना वचपा काढण्याची रणनीती भाजपाने आखली आहे.


परिवहन सभापतीसाठी भाजपाच्या वतीने शंकर दावानी आणि टीओके-शिवसेना-रिपाइ यांच्या वतीने दिनेश लहरानी यांच्यात आमना-सामना आहे. मागच्या वर्षी शंकर दावानी हे राष्ट्रवादी कडून परिवहन सदस्य झाले होते.त्यांनी भाजपात प्रवेश केल्याने पक्षाने त्यांना सभापतीच्या रिंगणात उतरवले आहे.7 विरुद्ध 6 अशी ही निवडणूक असली तरी टीओकेच्या वतीने मतांची फोडाफोडी होते काय?याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


दरम्यान इतर शहरांप्रमाणे प्रवासी दरवाढ करून देत नसल्याने,आणि त्यात रोडवरिल खडयांमुळे गाड्यांची बिघाड होत असल्याने उल्हासनगर पालिकेची परिवहन सेवा हाताळणारे कंत्राटदार राजा गेमनानी यांनी पाच वर्षापूर्वीच उल्हासनगरातील परिवहन सेवेचा गाशा गुंडाळला.

मात्र तेंव्हापासुन कोणताही कंत्राटदार निविदा भरण्यास पुढाकार घेत नसल्याने किंबहुना त्यांच्यात उदासीनता असल्याने पालिकेची परिवहन सेवा साडेसातीच्या विळख्यात सापडली आहे. .विशेष म्हणजे गेल्या 5 वर्षापासून परिवहन सेवाच ठप्प असतानाही उल्हासनगरात मात्र समिती आहे. त्यांना मानधन दिले जाते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com