भाजप-सेना युती 200 च्या आतच राहणार? `एक्झिट पोल`चे काय होणार?

भाजप-सेना युती 200 च्या आतच राहणार? `एक्झिट पोल`चे काय होणार?

पुणे : राज्यात शिवसेना आणि भाजप युतीने आपली घोडदौड कायम ठेवत प्राथमिक कलांमध्ये 178 जागांवर आघाडी ठेवली आहे. दुसरीकडे काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीला 88 जागांवर कौल मिळण्याची शक्यता आहे. भाजप आणि सेना युती ही 220 चा आकडा पार करेल, असे सर्वच एक्झिट पोल सांगत होते. प्रत्यक्षात ही युती दोनशे जागांचा टप्पा ओलांडेल की नाही, याची आता शंका येत आहे.

288 पैकी 277 जागांचे कल सकाळी साडे नऊ पर्यंत हाती आले होते. त्यात 178 जागांवर युती आघाडीवर होती. त्यात भाजपला 106 आणि शिवसेनेला 71 जागांची शक्यता वर्तविण्यात येत होती. दुसरीकडे राष्ट्रवादीला 49 आणि काॅंग्रेस 29 जागांवर आहे. त्यामुळे 220 चा आकडा भाजप-सेना पार करणार की नाही, याची उत्सुकता आहे.

भोसरीतून महेश लांडगे हे तब्बल 15 हजार मतांनी आघाडीवर आहेत. पुरंदर हवेलीतून शिवसेनेचे  विजय शिवतारे 1127 मतांनी आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीअखेर खडकवासलामध्ये राष्ट्रवादीचे सचिन दोडके तीन हजार मतांनी आघाडीवर आहेत. वडगाव शेरीत राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे हे 2200 मतांनी आघाडीवर आहेत

खेड मतदारसंघात राष्ट्रवादीचे दिलीप मोहिते यांनीा9181 मते, शिवसेनेचे सुरेश गोरे यांनी 2820 आणि अपक्ष अतुल देशमुख यांना 7631 मते मिळाली आहेत.  

सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले हे पिछाडीवर आहेत. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात पहिल्या फेरीनंतर दत्ता बहिरट (काँग्रेस) ३०८ मतांनी आघाडीवर.  सिद्धार्थ शिरोळे (भाजप) पिछाडीवर आहेत. पिंपरी राखीव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे अँड गौतम चाबुकस्वार हे मतदानाच्या पहिल्या फेरीत २,६६९ मतांनी आघाडीवर. मावळमध्ये सुनील शेळके 6100 मतांनी आघाडीवर आहेत. 

कर्जत जामखेड मतदारसंघातून राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उमेदवार रोहित पवार हे तीन हजार मतांनी आघाडीवर आहेत. दुसरीकडे धनंजय मुंडे हे परळीतून आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीत 5377 मतांनी सुमनताई पाटील यांना आघाडीवर आहेत. जळगाव शहर : पोस्टल मतमोजणीत भाजपचे सुरेश भोळे 1178, राष्ट्रवादीचे अभिषेक पाटील 673 अपक्ष उमेदवार काॅग्रेस चे माजी मंत्री प्रकाश आवाडे आघाडीवर,  भाजप आमदार सुरेश हाळवणकर अडचणीत

पारनेरला राष्ट्रवादीचे निलेश लंके पहिल्या फेरीत 514 मतांनी पुढे आहेत. बाळापूर मधून नितीन देशमुख 4000 मतांनी आघाडीवर आहेत. नाशिक  : येवला मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ २४०० मतांनी आघाडीवर. मात्र नांदगाव मतदारसंघात शिवसेनेचे सुहास कांदे ५११६ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे  पंकज छगन भुजबळ ३१२३ मते. यामध्ये पंकज भुजबळ पिछाडीवर आहेत. 

भोर मतदारसंघातून
 काँग्रेसचे संग्राम थोपटे 3886 मतांनी आघाडीवर आहेत. इंदापूर विधानसभा पहिल्या फेरीतील मतमोजणीत हर्षवर्धन पाटील यांनी 5253 आणि दत्तात्रय भरणेंना 4440 मते मिळाली आहेत. माढा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे यांनी यांनी शिवसेनेच्या संजय कोकाटे यांच्यावर तेरा हजार मतांची आघाडी घेतली आहे.

जुन्नरमध्ये दुसऱ्या फेरीअखेर अतुल बेनके :4478,  शरद सोनवणे 2558 आणि आशा बुचके यांना 3801 मते मिळाली. अतुल बेनके यांना 677 मतांची आघाडी. 

तुळजापूर मतदारसंघ पहिली फेरी -राणाजगजितसिंह पाटील (भाजप)- 3948, मधुकरराव चव्हाण (काँग्रेस)- 2064, राणाजगजितसिंह पाटील 1884 मतांनी आघाडीवर.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com