तरुण तुर्क म्हणून अशोक पवारांना लाल दिवा मिळणार का?
शिक्रापूर : दिवंगत खासदार तथा माजी गृहराज्यमंत्री बापूसाहेब थिटे यांच्यानंतर राज्याच्या मंत्रीमंडळात शिरूरमधील एकालाही संधी दिली मिळाली नाही. आता 2019 मध्ये तब्बल 23 वर्षांनंतर शिरूरला लाल दिवा मिळेल का, याची प्रतिक्षा आहे.
शिरुरकरांनी बहुतांश वेळा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राजकारणाला साथ दिल्याचा इतिहास आहे. सन १९८५ पासून दिवंगत माजी मंत्री बापूसाहेब थिटे, त्यानंतर माजी आमदार पोपटराव गावडे आणि सन २००९ ते २०१४ या काळात विद्यमान आमदार अशोक पवार यांना संधी मिळाली.

तालुक्याच्या एकुणच राजकारणात तालुक्यातील जनतेने शरद पवार यांच्या विचारांना साथ दिली मात्र स्व.बापूसाहेब थिटे यांना सन 1991 ते 93 या काळात दिल्या गेलेल्या गृहराज्यमंत्री पदानंतर शिरुरकरांना मंत्रीपदासाठी संधी मिळाली नाही.
२०१४ ते सन २०१९ या काळात शिरुर तालुकांतर्गत सर्व निवडणूकांमध्ये राष्ट्रवादीला एकहाती पाठबळ देण्याची तालुक्याची भूमिका, घोडगंगा सहकारी साखर कारखान्यावर सलगपणे अध्यक्षपदावर राहून कारखान्यातही राष्ट्रवादीला २१ : ०० अशी स्पष्ट सत्ता मिळविण्यासाठी वापरले गेलेले आमदार अशोक पवार यांचे कौशल्य आणि राज्यात भाजपाची हवा असताना विक्रमी ४१ हजार मतांनी अशोक पवार यांचे निवडून येण्याचे कसब या सर्व गोष्टी आता शिरुरकरांच्या पथ्यावर पडण्याची अपेक्षा आहे.
सन २००९ पासून शिरुर तालुका फोडून तो आंबेगाव विधानसभा मतदार संघाला जोडला गेला आणि शिरुरला राज्याच्या राजकारणात दुय्यम स्थान सुरू झाले. ३९ गावात समाविष्ट गावातील माजी आमदार पोपटराव गावडे, सूर्यकांत पलांडे, जिल्हा बॅंक संचालिका जयश्री पलांडे, माजी सभापती प्रकाश पवार, सुभाष उमाप, युवक राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांची राजकारणाची चाल खुंटल्याचा अनुभव वरील सर्व नेत्यांचे समर्थक उघडपणे बोलून दाखवितात.