"मिशन दिलासा'ने जागविली उमेद 

शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी अकोल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी "मिशन दिलासा' योजना सुरू केली. उच्च न्यायालयाने प्रशंसा केलेल्या या उपक्रमामुळे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.
"मिशन दिलासा'ने जागविली उमेद
"मिशन दिलासा'ने जागविली उमेद

निसर्गाच्या अवकृपेमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांसमोर कुटुंबाच्या पालन-पोषणाची गंभीर समस्या आहे. नातेवाईक, सावकार किंवा बॅंकेकडून कर्ज घेऊन शेतात काबाडकष्ट करून पेरणी केली. मात्र, कधी ओल्या तर कधी कोरड्या दुष्काळामुळे हातात आलेल्या पिकाची नासाडी झाली. उपजीविकेचे दुसरे साधन नसल्याने आणि मुलांचे शिक्षण आणि दररोजच्या रोजी-रोटीच्या प्रश्नाने हतबल झालेला शेतकरी आत्महत्येकडे वळू लागला. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना शासन सानुग्रह अनुदान देते. मात्र, जीवन जगण्यासाठी ही तोकडी रक्कम पुरेशी नाही. 

कुटुंबाचा कर्ता पुरुष गेल्यानंतर त्या कुटूंबांचा होत असलेली दैनावस्था न पाहवणारीच आहे. आत्महत्याग्रस्त कुटुंबातील वारसांना आर्थिक मदतीपोटी कितीही मदत दिली तरी त्या कुटुंबाची उणीव भरून निघू शकत नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रबोधन आणि मार्गदर्शन करीत जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी जिल्ह्यात "मिशन दिलासा' सुरू केले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देत दुखाःच्या गर्तेत अडकलेल्या शेतकरी कुटुंबीयांच्या मदतीला प्रशासन धावून आले. मत्स्य व्यवसाय, रोहयोअंतर्गत सिंचन विहीर, तरुणांना मोटर ड्रायव्हिंग किंवा आवश्‍यक प्रशिक्षण दिले. महिला व बाल विकास विभागाअंतर्गत बालसंगोपन, सामूहिक विवाह, कुक्कुट पक्षी पालन, सौर कंदील, पंप, ताडपत्री आदी साहित्याचे वाटप, विद्यार्थ्यांना खासगी शाळा तसेच महाविद्यालयात शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देऊन पैसा न देता वस्तू किंवा मदतीच्या स्वरूपात साहाय्य देण्यात आले. यातून आतापर्यंत दीड वर्षांत 117 कुटुंबीयांनी समाधानकारक आयुष्याकडे वाटचाल केल्याचे फलित आहे. यामुळेच काही महिन्यापूर्वीच उच्च न्यायालयाने या उपक्रमाची दखल घेऊन प्रशंसा केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून सर्व विभागाचे अधिकारी या अभियानाला प्राधान्याने राबवीत आहेत. 2010 ते 2016 पर्यंत झालेल्या आत्महत्यांचे प्रमाण बघितले असता त्यात घट झालेली दिसून येते. विशेष म्हणजे जिल्ह्यात मे मिशन दिलासा सुरू झाले. तेव्हापासून आत्महत्यांचे प्रमाण शंभरने कमी झाले आहे. 

या उपक्रमासंदर्भात जी. श्रीकांत म्हणाले, "जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांविषयी संवेदनशील आहे. त्यासाठीच मिशन दिलासा सुरू करण्यात आले. यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणाऱ्या नागरिकांचे आभार मानतो. ज्यादिवशी एकाही गावातील शेतकरी आत्महत्या करणार नाही, त्या दिवशी मी समाधान मानेन.'  

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com