शिवसेना उमेदवार रश्मी बागल हे एक सक्षम नेतृत्व : राणी वारे 

..
शिवसेना उमेदवार रश्मी बागल हे एक सक्षम नेतृत्व : राणी वारे 

पोथरे,  (ता. करमाळा):  करमाळा मतदार संघातील शिवसेना उमेदवार रश्मी बागल हे एक सक्षम नेतृत्व असून त्यांच्या माध्यमातून मांगी तलावात कुकडी व उजनीचे पाणी आणून तालुक्यातील उत्तर भागात सुजलाम सुफलाम् करण्यासाठी आपण सर्वांनी दीदींच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य राणी वारे यांनी केले.

पोथरे तालुका करमाळा येथे शनी मंदिरात नारळ फोडून  होम टू होम प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच व ज्येष्ठ नेते सोपान शिंदे होते. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष किरण बोकन,भाजपचे प्रांतिक सदस्य विठ्ठल भनगे, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष सुधाकर काका लावंड, शिवसेना नेते संजय शिंदे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. 

मांगी तलावात पाणी आणण्यासाठी आम्ही आमदार नारायण पाटील यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला परंतु पाटील यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे तलावात पाणी आणण्यासाठी रश्मी बागल यांना मोठे मताधिक्य घेऊन विधानसभेवर पाठवायचे आहे, असे आवाहन करमाळा किसानमोर्चा अध्यक्ष आदिनाथ सुरवसे यांनी केले आहे . 

मराठा आरक्षण पासून शेतकरी कर्जमाफी पर्यंतची कामे भाजप-सेनेच्या काळात झाले आहेत. त्यामुळे शिवसेना उमेदवार रश्मी बागल यांच्या पाठीशी सर्वांनी उभे रहावे, असे भाजप तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी यावेळी केले  . 

यावेळी विठ्ठल भनगे, आदिनाथ सुरवसे छगन शिंदे यांची भाषणे झाली. यावेळी शिवसेना, भाजप, आरपीआय, रासप, रयत क्रांती व शिवसंग्राम पक्ष या गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन हरिश्चंद्र झिंजाडे यांनी केले तर आभार दत्ता महाराज नंदरगे यांनी मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com