campaign foe state election | Sarkarnama

राजेनिंबाळकर, पाटील यांच्या सौभाग्यवतीही उतरल्या आता प्रचारात

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

उस्मानाबाद : उस्मानाबाद कळंब मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारासाठी आता त्यांच्या खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या सौभाग्यवती संयोजनी यांच्यासह कैलास पाटील यांच्या पत्नी शुभांगी या देखील प्रचारात सक्रीय झाल्या आहेत. कळंब तसेच उस्मानाबाद तालुक्‍यातील अनेक गावामध्ये घरोघरी जाऊन शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन या दोघीही महिलांसह अन्य मतदारांना करतांना दिसत आहेत. घरातील जबाबदारी सक्षमपणे सांभाळत या दोघीही थेट लोकांमध्ये जाऊन आपल्या उमेदवाराच्या पाठीशी तेवढ्याच ताकदीने उभ्या राहिल्या आहेत.

उस्मानाबाद : उस्मानाबाद कळंब मतदारसंघातील शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारासाठी आता त्यांच्या खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या सौभाग्यवती संयोजनी यांच्यासह कैलास पाटील यांच्या पत्नी शुभांगी या देखील प्रचारात सक्रीय झाल्या आहेत. कळंब तसेच उस्मानाबाद तालुक्‍यातील अनेक गावामध्ये घरोघरी जाऊन शिवसेनेच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन या दोघीही महिलांसह अन्य मतदारांना करतांना दिसत आहेत. घरातील जबाबदारी सक्षमपणे सांभाळत या दोघीही थेट लोकांमध्ये जाऊन आपल्या उमेदवाराच्या पाठीशी तेवढ्याच ताकदीने उभ्या राहिल्या आहेत. मतदारांकडून देखील त्यांच्या प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळतांना दिसतोय. 

महिलापर्यंत उमेदवार पोहचु शकत नाहीत, त्यामुळे अनेकदा त्यांचे प्रश्नही पुढे येत नाहीत, पण संयोजनी व शुभांगी यांनी महिलांचे प्रश्न,व्यथा ऐकुन घेतल्याने समाधान व्यक्त होत आहे. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व कैलास पाटील समर्थपणे प्रचाराचा किल्ला लढवत असतांना आता त्यांच्या कारभारणी देखील मदतीला धावून आल्याची चर्चा या निमित्ताने सुरू आहे. 

सोशल मिडियावर देखील त्यांच्या प्रचार, भेटीगाठीचे नियोजन याची माहिती दिली जात असल्यामुळे गावागावांमध्ये महिला त्यांची आतुरतेने वाट पाहतांना दिसत आहेत. गेल्या तीन दिवसापासुन त्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख